एक्स्प्लोर

आमचं कुटुंब एक आहे आणि एकच राहिल; अजितदादा परतल्याचा आनंद : रोहित पवार

अजितदादा परतल्यानंतर कुटुंबीय म्हणून आनंद झालाच, पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणूनही आनंद झाला, तसेच आमचं कुटुंब एक आहे आणि एकच राहणार, असंही रोहित पवार यांनी बोलताना सांगितले.

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पॉलिटिकल ड्रामा सुरु होता, आता त्यावर पडदा पडला आहे, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अजित पवार पुन्हा आपल्या कुटुंबात आणि राष्ट्रवादीत परतले. घडलेल्या सर्व प्रकारावर बोलताना नवनिर्वाचित आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी एबीपी माझाला प्रतिक्रीया दिली. 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपने स्थापन केलेलं सरकार अवघ्या 72 तासांतच कोसळलं. पाहा व्हिडीओ : पुढच्या पाच वर्षात खूप काम करायचं आहे : रोहित पवार अजित पवारांविषयी बोलताना रोहित पवारांनी सांगितले की, 'दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याचं टीव्हीवर पाहिलं, पण विश्वास बसत नव्हता. का झालं?, कसं झालं?, याच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केला नाही. आता पुढे काय होणार हे माहीत नव्हतं, पण दादा परत नक्की येणार असा विश्वास होता.' रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, 'आम्ही दादांना ओळखतो. इतक्या कसोटीच्या क्षणीही दादांनी कुटुंबियांसोबतच इतरांचेहे फोन घेतले. काहीही झालं तरी कुटुंबाकडे दुर्लक्षं करून चालत नाही. आमचं एक कुटुंब आहे आणि एकच राहिल.' राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी : अजित पवार मी सातत्याने सांगत असतो की, आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, दादांची काम करण्याची पद्धत आणि क्षमता आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे दादांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी परत यावं, अशी अपेक्षा होती. दादा परतल्यानंतर पुन्हा एकदा साहेबांना भेटले, ही आमच्यासाठी गोड बातमी आहे, कुटुंबीय म्हणून आनंद झालाच पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणूनही तेवढाच आनंद झाला. दादांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर साहेब अस्वस्थ होते. पण ते अस्वस्थ असल्याचं कधीच दाखवत नाहीत, ते आलेल्या अडचणीतून मार्ग कसा काढायचा याचाच विचार करत असतात.' असं रोहित पवार यांनी सांगितलं. भाजपमुळे पवार कुटुंबात फूट पडेल अशी भिती कुठेतरी मनात होती का?, असं विचारल्यावर रोहित पवार म्हणाले की, भाजपला विकासाची निती कधीच दिसत नाही. त्यांची स्टाईल ही नेहमीच तोडाफोडीची असते. तिच स्टाईल त्यांनी यावेळीही लागू करण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी दादांनाही ही स्टाईल योग्य वाटत नसेल म्हणूनच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि साहेबांची भेट घेतली.' संबंधित बातम्या : आमदारांचा शपथविधी, विधानभवनातील खास क्षण 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'... 28 तारखेला उद्धव ठाकरे शपथ घेणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Sawant Meet Govinda :  माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंतांकडून गोविंदाची विचारपूसCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले,
दुर्धर आजारानं ग्रस्त ऐश्वर्या, सारखं वाढतंय वजन? नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget