एक्स्प्लोर

मुंबईत आज राज्य सरकारचा महारोजगार मेळावा; रोजगाराच्या 7 हजार संधी उपलब्ध

मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  

Mumbai News:  राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आज सकाळी 10 वाजेपासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, 3 महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील 7 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून नोकरी इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. 

मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  

मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर अॅप्रेंटीसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्राॅनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण ७ हजार पदे उपलब्ध आहेत.

अप्रेंटीसशिपची संधीही उपलब्ध

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उतीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत.

मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याव्दारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणा-या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही उमेदवारांना या मेळाव्यात घेता येणार आहे. 

ही बातमी देखील वाचा

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Embed widget