(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Government Formation LIVE | भाजपाच्या असमर्थतेनंतर काँग्रेसमध्ये खलबतं सुरू, थोड्यात वेळात जयपूरमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक
LIVE
Background
मुंबई : महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं समीकरण होऊन सरकार निर्माण होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं कौतुक केलं तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भाजप सत्तास्थापनेत अपयशी ठरल्यास आघाडीही सत्तास्थापनेचा विचार करु शकते असे संकेत दिले होते तर त्यातच आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही आज अशीच भूमिका मांडल्यानं महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार केल्याची स्तुतीसुमनं संजय राऊत यांनी उधळली आहेत. बेळगाव-कारवारप्रश्नी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेचं कौतुकही केलं. त्यामुळे राऊतांच्या मुखी आघाडीबद्दल निर्माण झालेलं ममत्व हे सूचक आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेते आमदार नवाब मलिक यांनी भाजप सत्तास्थापनेत अपयशी ठरल्यास आघाडीही सत्तास्थापनेचा विचार करु शकते असे संकेत दिले होते. त्यातच आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही अशीच भूमिका मांडल्यानं राज्यात महाशिवआघाडीच्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरु झाली आहे. जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर सेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.
भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेकडून देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली आहे. दरम्यान, शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्री आमचाच होईल, असा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काल 9 नोव्हेंबरला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिले. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सेनेची भूमिका मांडली. यावेळी इतका उशिर का लावला, असा प्रश्न उपस्थित करत भाजपला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
राज्यात सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला निमंत्रण दिलं आहे. भाजपकडून सत्तास्थापनेबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेकडून देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मध्यरात्री मातोश्रीहून शिवसेना आमदारांशी चर्चा करण्यासाठी मालडच्या रीट्रीट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. चर्चेनंतर आदित्य ठाकरे रीट्रीट हॉटेलमध्येच मुक्कामाला आहेत.