एक्स्प्लोर

Strike : संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार, आज मध्यरात्रीपासून शासकीय कर्मचाऱ्यांची संपाची हाक

Strike : विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

Government Employees Strike  : नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत.  या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.  राज्य शासकीय कर्मचा-यांच्या दोन दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे.  या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार आहेत. 

विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. संपात सहभागी होणा-या कर्मचाऱ्यांसंदर्भात 'काम नाही वेतन नाही'  हे धोरणा राबवण्यात  येणार आहे.  संपाची घोषणा केल्याने कर्मचारी आणि अधिकारी यांची रजा रद्द करण्यात यावी अशी सूचना परिपत्रकातून देण्यात आली आहे. संप सुरु झाल्यानंतर दुपारी 12 आणि 2 वाजता संपाच्या संदर्भात माहिती मंत्रालयात कळवण्यात यावी, असे देखील परिपत्रकात म्हटले आहे. 

 उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकारी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचा-यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी  पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीला अजित पवार, मुख्य सचिव आणि कर्मचारी आणि अधिकारी संघटना उपस्थित राहणार  आहे. संध्याकाळी 7 नंतर सह्याद्रीवर बैठक आहे. जर तोडगा निघाला नाही तर कर्मचारी संपावर जाणार आहे.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

  • राज्यातील अडीच लाखांहून अधिक असलेली रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने न भरता नियमित वेतनश्रेण्यांवर भरावीत
  • पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटीसंदर्भातील खंड- 2 अहवालाची अंमलबजावणी करावी
  • केंद्र आणि अन्य 25 राज्यांप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे
  • सातव्या वेतन आयोग थकबाकीच्या तिसऱ्या हप्ता तातडीने मिळावा
  • सातव्या आयोगानुसार केंद्रात लागू केलेले वाहतूक आणि अतर भत्ते राज्यातही लागू व्हावेत
  • विविध खात्यांतीस रखडलेल्या बढती प्रक्रिया विनाविलंब कराव्यात
  • महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात
  • सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ग्रेड पे ची सातव्या वेतन आयोगांतर्गत एस -20 मर्यादा काढाली

इतर महत्त्वाच्या बातम्या :

ST Strike: एसटी संपावर पुढील सुनावणी शुक्रवारी; कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचं राज्य सरकारचे आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Embed widget