एक्स्प्लोर

सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे केव्हाच रद्दीत विकले : एकनाथ खडसे

'सर्वांना एकत्र घेऊन लढले असते तर आणखी 25 जागा वाढल्या असत्या; जेष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय?', असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींवर आपल्याला अनेक प्रतिक्रीया पाहायला मिळतात. अशातच भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 'सर्वांना एकत्र घेऊन लढले असते तर आणखी 25 जागा वाढल्या असत्या; जेष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय?' असं एकनाथ खडसे विधीमंडळ परिसरात माध्यामांशी बोलताना म्हणाले. तसेच सिंचन घोटाळ्याचे जे बैलगाडीभर पुरावे होते, ते आम्ही केव्हाच रद्दीत विकले आहेत, कारण त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता, असं खडसे म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ :  सिंचन घोटाळ्यांचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले : एकनाथ खडसे

'2014 ला भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत सामुहिक निर्णय घेतला. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता असल्यामुळे त्या निर्णयाची घोषणा केली. हा निर्णय माझा वैयक्तिक नसून तो पक्षाचा होता. त्या निर्णयाच्या अनुषंगाने  जे काही चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं ते आपण सर्वांनी पाहिलंच. त्यानंतर ही चूक दुरूस्त करण्याचाही प्रयत्न झाला आणि सहा महिन्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आली. त्यानंतर गेले साडेचार वर्ष युतीच्या माध्यमातून सरकार चालवलं. 2019मध्येही महायुतीला याठिकाणी मतदान करण्यात आलं असून जनतेनं स्पष्ट बहुमतही दिलं होतं. पण दुर्दैवानं मुख्यमंत्रीपद कोणाला? आणि किती वर्षांसाठी? या कारणामुळे भाजप आणि शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे गेल्या महिन्याभरात ज्या घडामोडी झाल्या त्या आपण पाहिल्याच आहेत. स्पष्ट बहुमत असूनही महायुतीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही.' असं एकनाथ खडे बोलताना म्हणाले.

Maharashtra Govt Formation | उद्धव ठाकरे शपथविधीसाठी राज ठाकरेंना निमंत्रण देण्याची शक्यता

'माझं स्पष्ट मत आहे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मी, आमच्यासारख्यांना घेऊन निवडणूक लढली असती, तर 25 जागा वाढल्या असत्या. पक्ष कधीच चूकत नाही. ज्यांच्या हातात धुरा दिलेली असते, त्यांचा निर्णय चुकू शकतो.' असं म्हणत एकनाथ खडसेंनी थेट भाजप नेतृत्त्वावर निशाणा साधला. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, 'जेष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय? हा प्रश्न मी वरिष्ठांपासून सर्वांना वारंवार विचारला. माझी राजकारणातील 40 ते 42 वर्षांची तपश्चर्या आहे, माझा अधिकार होता. कठीण कालखंडामध्ये आम्ही पक्ष उभा केला आहे. त्यामुळे पक्षाचा विरोधात आम्ही जाऊ शकत नाही. या पक्षाच्या यशासाठीच आम्ही प्रयत्न केले असते. दुर्दैवाने ज्या लोकांनी या पक्षाच्या विकासासाठी मदत केली, अशा लोकांनाही बाजूला ठेवल्याचा या निवडणुकीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं.'

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget