एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Govt Formation | उद्धव ठाकरे शपथविधीसाठी राज ठाकरेंना निमंत्रण देण्याची शक्यता
महाविकासआघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी (26 नोव्हेंबर) राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतील.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. मुंबईत शिवतीर्थावर उद्या (28 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधीला संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्याची चर्चा रंगली आहे. या निमंत्रणामुळे दोन्ही भावांमधील दूरावा कमी होईल असं म्हटलं जात आहे.
28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतील. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी (26 नोव्हेंबर) राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. अनेक अडथळ्यांनंतर शिवसेना पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आली आहे आणि ती ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली.
महाविकासआघाडीकडूनही निमंत्रण मिळण्याची शक्यता
दोन्ही भावांमध्ये राजकारणापलिकडचं नातं आहे. अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. तर काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे लिलावती रुग्णालयात असताना राज ठाकरे स्वत: गाडीतून त्यांना मातोश्रीवर घेऊन गेले होते. ईडी चौकशीच्या वेळीही उद्धव ठाकरेंनी राज यांची बाजू घेतली होती, अशा अनेक भावनिक आठवणी दोघांमध्ये आहेत. याशिवाय ठाकरे कुटुंबातील सदस्य शिवतीर्थावर शपथ घेणार आहे. तर शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राज ठाकरेंनीही भाजपविरोधात निवडणूक लढवली नाही. त्यामुळे महाविकासआघाडीकडूनही त्यांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान मातोश्रीवरुन अद्याप निमंत्रण आलेलं किवा कोणी व्यक्ती तिथे गेलेली नाही. परंतु उद्धव ठाकरे स्वत: जाऊन राज ठाकरेंना आमंत्रण देण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे शपथविधीला आले तर आनंदच : विनायक राऊत
राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला आले तर आनंदच होईल. त्यांच्या शपथविधीसाठी देशातील अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रातील काही मंत्री येणार आहे. देवेंद्र फडणवीस सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, त्यांना सन्मानाने आमंत्रण देणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. तसंच दिल्लीतील नेत्यांनाही शपथविधीसोहळ्यासाठी निमंत्रण देणार असल्याचंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या
'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'... 28 तारखेला उद्धव ठाकरे शपथ घेणार
आता ठाकरे सरकार, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब
बहुमत नसताना फडणवीसांनी शपथ घ्यायला नको होती : एकनाथ खडसे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement