एक्स्प्लोर

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा नाहीच, परवाना बंदी कायम; राज्य सरकारला सोमवारपर्यंत भूमिक स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

Johnson and Johnson : जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी टाल्कम पावडरचं उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय योग्यच, ग्राहकांसाठी सुरक्षित उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करणं ही कंपनीची जबाबदारी

Johnson and johnson : जॉन्सन अँड जॉन्सनच्या 'बेबी टाल्कम पावडर' उत्पादनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं हायकोर्टात केला आहे. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा आणि लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी असलेल्या नियमांची अंमलबजावणी न केल्यास आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात सरकार अपयशी ठरेल, असा दावाही सरकारनं गुरूवारी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित  उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करणं ही याचिकाकर्त्या कंपनीची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे बेबी पावडरच्या गुणवत्तेची खात्री न देता त्याचा अंतिम वापर होईपर्यंत नियमांनुसार उत्पादन विक्री करता येणार नाही, अशी ठाम भूमिका देखील राज्य सरकारनं या प्रतिज्ञापत्रातून घेतली आहे. त्याची दखल घेत या बेबी टाल्कम पावडरच्या आणखी काही नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे का? अशी विचारणा करत राज्य सरकारला त्यावर 14 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं एफडीएच्या परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर या लोकप्रिय उत्पादनात प्रमाणाबाहेर असलेले जीवाणू कमी करण्यासाठी आरोग्यास हानिकारक अशी निर्जंतुकीकरण प्रक्रिया केल्याचा आरोप करून त्यांचा सर्वच्या सर्व प्रसाधनं उत्पादन परवाना रद्द अन्न व औषध प्रशासनानं नुकताच रद्द केला आहे. मात्र हा निर्णय अन्यायकारक असल्यानं ही याचिका निकाली निघेपर्यंत त्याला स्थगिती देत मुलुंड येथील कंपनीच्या प्रकल्पामध्ये बेबी पावडरच्या उत्पादन व विक्रीस मुभा देण्याची मागणी केली या याचिकेतून केली आहे.

न्यायमूर्ती गंगापूरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाली. कोलकाता येथील केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळेच्या अहवालाच्या आधारावर एफडीएकडून कंपनीच्या बालप्रसाधन उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.

कंपनीचा दावा काय? -
बेबी पावडरच्या या अद्ययावत उत्पादनाचा चाचणी अहवाल सादर करूनही अपिलीय प्राधिकरणानं कंपनीचं अपील फेटाळून लावलं आहे. ज्या अहवालाच्या आधारे हा परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले, तो अहवाल विचारातच घेतला गेला नाही. तसेच एफडीएच्या आदेशात साल 2018-19 या वर्षांतील उत्पादनाचा दाखला देण्यात आल्याचा दावाही कंपनीकडून केला गेला आहे. आम्ही या उत्पादनाचे नमुने चाचण्यांसाठी पुणे, नाशिक येथील एफडीए कार्यालयात पाठवले होते. त्यानंतरही प्रशासनानं कोलकाता येथील प्रयोगशाळेत या नमुन्यांची पुनर्चाचणी करण्यास सांगितलं. ही चाचणी करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही कंपनीला त्याची पूर्वसूचना दिली गेली नाही. याशिवाय एफडीएनं दोनवेळा कारणे दाखवा नोटीस बजावताना त्यातही केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळेच्या अहवालाचा उल्लेख केलेला नसल्याचा दावाही कंपनीनं केला आहे. उत्पादन निर्मिती परवाना रद्द किंवा निलंबित करण्याबाबतचा कोणताही नियम अस्तित्वात नाही, असं असतानाही एफडीएचा बेबी पावडरचं उत्पादन बंद करण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचा कंपनीनं दावा केला आहे.

काय आहे प्रकरण? -
अन्न व औषध प्रशासन विभागानं 15 सप्टेंबरपासून कंपनीचा परवाना रद्द करण्याचा आदेश काढल्याची माहिती कंपनीतर्फे हायकोर्टात देण्यात आली. मात्र पाच दिवसांनंतर, एफडीए आयुक्तांनी या आदेशाचं पुनरावलोकन करत कंपनीनं तात्काळ मुलुंड येथील प्रकल्पात सुरू असलेलं बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री थांबविण्याचे आदेश काढले. या आदेशाला अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांसमोर कंपनीकडून रितसर आव्हान देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी सुनावणीनंतक हे अपील फेटाळून लावलं. तसेच आदेशाला स्थगिती देण्यासही नकार दिला. त्यामुळे अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget