एक्स्प्लोर

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाजीपाल्याचे दर दुप्पट!

या शेतकरी संपाला महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागातही याचा परिणाम जाणवू लागला आहे.

मुंबई : राष्ट्रीय किसान महासंघाच्या शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद असल्याने भाजीपाला महागला आहे. किसान महासंघाच्या घोषणेप्रमाणे राज्यातले शेतकरी 10 जूनपर्यंत संपावर असतील. या संपात देशभरातील सुमारे 120 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. या शेतकरी संपाला महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागातही याचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आज नेहमीपेक्षा निम्म्याच भाजीपाला गाड्या दाखल झाल्या आहेत. परिणामी मार्केटमध्ये आज भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. पुढील दहा दिवस हा संप जर सुरु राहिल्यास भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावरच होणार आहे. त्यामुळे या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी भाजी व्यापारी करत आहेत. शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध या दहा दिवसांच्या काळात शेतकरी आपला कोणताही माल विक्रीसाठी काढणार नाही. संपाच्या पहिल्याच दिवशी खेड-शिवापूर टोलनाक्यावर हजारो लीटर दूध रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. पुणतांब्यात शुक्रवारी शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारचं श्राद्ध घातलं. त्याचबरोबर ग्रामपंचायतीवर काळी गुढी उभारुन सरकारचा निषेध करण्यात आला. शेतकरी संपावर, आजपासून 10 दिवस संप! तर राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संपाचा भाग म्हणून दुधाच्या टँकरमधून दूध सोडलं. गुरुवारी रात्री अडीचच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर हा प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर दुधाची नदी वाहत असल्याचं चित्र दिसलं. अहमदनगरमधल्या अकोले तालुक्यात तहसील कार्यालयाच्या गेटवर अडवल्याने आंदोलक शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी गेट तोडून तहसील कार्यालयात प्रवेश केला. शेतकरी सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला धडक दिली. दरम्यान, संपात सहभागी शेतकऱ्यांनी धान्याची नासाडी करु नये अशी विनंती कृती समितीचे सदस्य एस बी नाना पाटील यांनी आंदोलनकांना केली. सध्या शेतकरी संप नको, नुकसान शेतकऱ्यांचंच : राजू शेट्टी शेतकरी आंदोलनाला एक वर्ष दुसरीकडे गेल्या वर्षी नगर जिल्ह्यातील पुणतांब्यातून सुरुवात झालेल्या शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी (1 जून) एक वर्ष पूर्ण झालं. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीही संप केला होता. त्यावेळी त्यांनी विविध मागण्या केल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,  शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, या मागण्यांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी नवी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी नवी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget