Scholarship Exam : पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! स्कॉलरशिपच्या परीक्षेची तारीख ठरली
scholarship exam News:राज्यातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या दोन्ही इयत्तेच्या परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.
Maharashtra scholarship exam News: राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं स्कॉलरशीपच्या परीक्षेची तारीख फायनल केली आहे. राज्यातील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या दोन्ही इयत्तेच्या परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेची अधिसूचना www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले असून 15 डिसेंबर पर्यंत अर्ज भरायचा आहे. विलंब शुल्कासह 23 डिसेंबर 2022 आणि अति विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकता, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सांगितलं आहे.
31 डिसेंबर 2022 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असं सुद्धा महाराष्ट्राचे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आलं आहे.
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार, 15 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. विलंब शुल्कासह 23 डिसेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. तर अति विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकता येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सांगितलं आहे.
या दोन्ही इयत्ताच्या शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची 31 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी अर्ज भरावा. नाही तर 31 डिसेंबर 2022 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
राज्यातून या परीक्षेसाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी बसत असतात. त्यातून अनेकांची निवड या स्कॉलरशिपसाठी होत असते. त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि खासकरुन त्यांच्या पालकांनी वेळेवर अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आलंय.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI