एक्स्प्लोर

Maharashtra Elections: मोठी बातमी : नगरपालिका-नगरपंचायत मतदानाची वेळ संपली, कुठे राडा तर कुठे उमेदवारच मतदानाला पोहोचला नाही, 21 तारखेच्या निकालाकडे लक्ष

Maharashtra Elections: नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 262 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली.

Maharashtra Elections: नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 262 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली. सांयकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. नगरपालिका-नगरपंचायत मतदानाची वेळ संपली तरी देखील राज्यातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. तर अनेक ठिकाणी राडा झाल्याचे देखील दिसून आले. आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे. 

Muktainagar Election: मुक्ताईनगरात अपक्ष उमेदवारालाचे स्वतःचे मत हुकले

मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीत अनोखी घटना घडली. अपक्ष उमेदवार ज्योती भालेराव यांना स्वतःच मतदानाचा हक्क बजावता आला नाही. संध्याकाळी ठरलेल्या साडेपाच वाजेच्या वेळेनंतर त्या मतदानासाठी केंद्रावर आल्या, मात्र वेळ संपल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. फक्त उमेदवारच नव्हे तर त्यांच्या बुथवरील कार्यकर्त्यालाही मतदान करता आले नाही, तसेच उशिरा पोहोचलेल्या काही मतदारांचीही मतदानाची संधी हुकली. उमेदवार स्वतः वेळेत मतदान केंद्रावर पोहोचू न शकल्याने स्थानिक पातळीवर आश्चर्य आणि चर्चांना उधाण आले आहे.

Mahad Shivsena Vs NCP Rada: महाडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये हाणामारी 

महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात तणाव उसळला. दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आले आणि तुफान हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली. जाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. ही बाचाबाची सुरु असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर विकास गोगावले हेच रिव्हॉल्वर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा ताफा तैनात केल्याचे पाहायला मिळाले.  

Manmad Election:  मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले

मनमाडमध्ये नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद पेटला. प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराने आरोप केल्यानंतर दोन्ही गट भिडले. पाहता पाहता ढकलाढकली आणि धक्काबुक्की सुरू झाली. या गोंधळात भाजपचे उपाध्यक्षही धक्काबुक्कीला सामोरे गेले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मतदारांची पळापळ झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना वेगळे केले आणि मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.

Yeola Election: येवल्यात अजित पवार गट आणि शिवसेनेत हाणामारी 

येवल्यातील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये झालेल्या वादातूनही राडा उसळला. मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवले. मतदान केंद्राबाहेर सतत तणाव निर्माण होत असल्याने पोलिस कर्मचारी सतत तैनात ठेवण्यात आले आहेत.

Satana Election: सटाण्यात मतदान केंद्राजवळ वाद

सटाणा नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळील मतदान केंद्र क्रमांक 10 जवळ अन्य कारणातून अचानक दोन गटांमध्ये राडा झाला. घरगुती वादातून सुरू झालेला हा वाद मतदान केंद्राजवळ घडल्याने नागरिकांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने मोठा फौजफाटा आणून परिस्थिती नियंत्रणात आणली. राड्यातील काही सहभागी थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्याचे समजते. मतदान केंद्राजवळील एका उमेदवाराचा बूथ पोलिसांनी हटवून कायदा व सुव्यवस्थेसाठी कडक बंदोबस्त उभा केला आहे.

Trimbakeshwar Election: त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची

त्र्यंबकेश्वरमध्ये नूतन विद्यालय मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून पोलिस आणि उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाली. वाद चिघळू लागल्याने मतदान केंद्राबाहेर तणाव पसरला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल करण्यात आली.

Jalgaon Election: कर्मचारीच मतदारांना सांगत होते कमळाचे बटन दाबा

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव इथे मतदान केंद्रावरील कर्मचारी मतदारांना कमळाचे बटण दाबा असे सांगत असल्याच्या संशय वरुन काही जणांनी आक्षेप घेतल्याचा प्रकार घडला. यामुळं मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. वरणगाव नगरपालिकेची निवडणुसाठी मतदान सुरु असताना, प्रभाग क्रमांक दहा मधील सिद्धेश्वर नगर येथील बुथ क्रमांक वरती हा गोधळ झाला आहे. बुथ क्रमांकावरील जावळे नामक अधिकारी हा मतदारांना कमळाचे बटन दाबण्यासाठी सांगत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळं काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी आणि माजी नगराध्यक्ष व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी या बुथवरती भेट देत त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा आणि फेर निवडणूक घ्यावी अशी मागणी लावून धरली. यावेळी पोलीस आणि निवडणूक अधिकारी आणि उमेदवार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. 

Jalgaon Election: रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या

जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या खासदार आणि मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला अडवल्याच्या कारणातून रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. या प्रकारामुळे शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. भाजपच्या उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिसांनी अडवल्याच्या कारणातून रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. या दरम्यान काही मिनिटे तीव्र शाब्दिक चकमक झाली. दुसरीकडे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोगस मतदानाचा गंभीर आरोप केला. या आरोपावरून देखील मतदान केंद्राबाहेर राडा झाल्याचे पाहायला मिळाले. 

Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असताना हिंगोलीतील कळमनुरी येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मोठ्या वादात सापडले. मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला असून या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष बांगरांना कठोर शब्दांत सुनावले. तर संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

अकोला जिल्ह्यातील मतदान टक्केवारी   

4 नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 

1) हिवरखेड नगरपालिका - 73.92
2) बार्शीटाकळी (नगरपंचायत) -73.07
3) तेल्हारा नगरपालिका -70.00
4) मूर्तिजापूर नगरपालिका -64.50
5) अकोट नगरपालिका – 65.12


परभणीच्या पाथरी नगर परिषेदसाठी रेकॉर्ड ब्रेक मतदान 

तब्बल ७७.३४% झाले मतदान 

एकूण ३५२०८ मतदारांपैकी २७२३१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 

पाथरीत राष्ट्रवादी अजित पवार,एकनाथ शिंदे शिवसेना आणि कांग्रेस मध्ये काट्याची लढत


नाशिक जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 

- पिंपळगाव 73.21 टक्के 
- मनमाड 63.61 टक्के 
- भगूर 73.28 टक्के 
- नांदगाव 60.28 टक्के
- सिन्नर 67.65 टक्के 
- सटाणा 67.54 टक्के 
- त्र्यंबकेश्वर 85.66 टक्के 
- इगतपुरी 68.68 टक्के
- ओझर 62.31 टक्के 
- चांदवड 74.52 टक्के

पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत मतदान टक्केवारी

डहाणू - ६७.२३%
पालघर - ६५.०७%
जव्हार - ८२.९४%
वाडा - ७४ ७८%

 आणखी वाचा 

Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, आयोगानं कारवाई करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, आयोगानं कारवाई करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Embed widget