अर्ज भरलेल्या ठिकाणी सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती शिंदे सरकार उठवणार?
Maharashtra Election : राज्यातील सहकारी संस्था निवडणुकीवरील स्थगिती उठवण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या ठिकाणी स्थगिती उठवली जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Election : राज्यातील सहकारी संस्था निवडणुकीवरील स्थगिती उठवण्याची शक्यता आहे. उमेदवाारी अर्ज भरलेल्या ठिकाणी स्थगिती उठवली जाण्याची शक्यता आहे. स्थगिती उठवण्याबाबत विरोधक आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा झाली. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. या निवडणुकीला मतदानाच्या आदल्या दिवशी स्थगिती देण्यात आली होती. राज्यामध्ये सर्वदूर पावसाचे थैमान सुरू असल्याने अनेक ठिकाणी महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे राज्यातील आता सहकारी संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर गेल्या आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर 2022 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत त्याच ठिकाणी थांबण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
राज्यांमध्ये एकंदरीत सहकारी संस्थांच्या निवडणुका नजर टाकल्यास जवळपास 32 हजार 473 संस्था निवडणुकीत पात्र आहेत. त्यामधील 7 हजार 620 संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया 5 हजार 636 संस्थांमध्ये सुरू झाली होती, तर नामनिर्देशन सुरू न झालेल्या संस्था या 1हजार 984 आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कारणांमुळे निवडणुका पुढे जात असल्याने सर्वसामान्य सभासदांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. दुसरीकडे अधिक कालावधी मिळत असल्याने संचालकांमध्ये मात्र चांगलाच उत्साह संचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात शंभरावर लोकांवर मृत्यू ओढवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या