एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Maharashtra Economic Survey : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर, आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ अपेक्षीत, तर कृषी क्षेत्रात...

Maharashtra Economic Survey : महाराष्ट्र राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra Economic Survey) जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra Economic Survey : महाराष्ट्र राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra Economic Survey) जाहीर करण्यात आला आहे. सन 2022-23 च्या पुर्वानुमानानुसार राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा विकासाचा दर हा देशाच्या विकास दरापेक्षा कमी आहे. तसेच  राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. 

स्थूल राज्य उत्पन्न 35 लाख 27 हजार 84 कोटी अपेक्षित

2022-23 मध्ये सांकेतिक (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न  35 लाख 27 हजार 84 कोटी अपेक्षित आहे. तर वास्तविक (रिअल) (सन 2011-12 च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न      21 लाख 65 हजार 558 कोटी अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलं आहे.

 तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 2.5 टक्के

राजकोषीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 2.5 टक्के आहे. राज्यात नोव्हेंबर, 2022 अखेर एकूण 1 हजार 543 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. या योजनेच्या सुरुवातीपासून नोव्हेंबर, 2022 पर्यंत राज्यातील गरीब आणि गरजू व्यक्तींना एकूण 12.22 कोटी शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले.

महसुली जमा  2 लाख 51 हजार 924 कोटी

प्रत्यक्ष महसुली जमा  2 लाख 51 हजार 924 कोटी (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 62.4 टक्के) आहे.
तर राज्याचा महसुली खर्च हा 4 लाख 27 हजार 780 कोटी अपेक्षित असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. सन 2022-23 च्या खरीप हंगामामध्ये 157.97 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, तेलबिया, कापूस, ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे 10 टक्के, 19 टक्के, पाच टक्के आणि चार टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर कडधान्याच्या उत्पादनात 37 टक्के घट अपेक्षित आहे. सन 2022-23 च्या रब्बी हंगामामध्ये 57.74 लाख हेक्टर क्षेत्रांवर पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कडधान्याच्या उत्पादनात 34 टक्के वाढ अपेक्षित असून तृणधान्ये व तेलबियांच्या उत्पादनात प्रत्येकी 13 टक्के घट अपेक्षित आहे.

दरम्यान, मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे (राज्य क्षेत्र) प्रकल्पांद्वारे  जून, 2021 अखेर 55.24 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. सन 2021-22 मध्ये प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र 43.38 लाख हेक्टर (78.5 टक्के) होते. शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019 च्या सुरुवातीपासून दिनांक 31 डिसेंबर, 2022 पर्यंत 32.03 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 20 हजार 425 कोटी रकमेचा लाभ देण्यात आला आहे.

कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना 2 हजार 982 कोटी रकमेचा लाभ 

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात जुलै 2022 पासून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ति योजना सुरु करण्यात आली. 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबवण्यात येत आहे. सन 2022-23 मध्ये डिसेंबर अखेर 8.13 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 2 हजार 982 कोटी रकमेचा लाभ देण्यात आला. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत  जून, 2020 ते डिसेंबर, 2022 या कालावधीमध्ये राज्यात  2.74 लाख कोटी गुंतवणूक झाली आहे. तसेच 4.27 लाख अपेक्षित रोजगार असलेले प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय?

अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी म्हणजेच आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. या अहवालाच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक आरोग्याचा लेखाजोखा मांडला जाईल. या सरकारी अहवालातून राज्याची अर्थव्यवस्था कशा स्थितीत आहे हे समोरं येईल. यामध्ये प्रामुख्याने सरकारी योजना किती पुढे गेल्या? या वर्षी विकासाचा ट्रेण्ड काय होता ?कोणत्या क्षेत्रात किती विकास झाला? योजनांची अंमलबजावणी कशी झाली? आदी माहिती या अहवालातून मांडण्यात येईल अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी येणाऱ्या या अहवालावर सर्वांची नजर असेल कारण पुढील आर्थिक वर्षात जीडीपी किती असेल याचा अंदाज देखील या निमित्ताने वर्तवला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या:

Budget 2022: बजेटपूर्वी मांडण्यात येणारा आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय? देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तो का महत्वाचा असतो?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आले? राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याने केला खुलासा
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आले? राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याने केला खुलासा
Shivsena: लोकसभेला मदत करतो, विधानसभेला आमचा विचार करा; शिंदे गटातील आमदारांची ठाकरेंना ऑफर; सचिन अहिरांचा गौप्यस्फोट
लोकसभेला मदत करतो, विधानसभेला आमचा विचार करा; शिंदे गटातील आमदारांची ठाकरेंना ऑफर; सचिन अहिरांचा गौप्यस्फोट
Pandharpur Rain : पंढरपूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाची जोरदार बॅटिंग, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची तारांबळ
पंढरपूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाची जोरदार बॅटिंग, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची तारांबळ
Pathardi Bandh: पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट, युवक ताब्यात; आज पाथर्डी बंदची हाक
पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट, युवक ताब्यात; आज पाथर्डी बंदची हाक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Eknath Shinde on Shiv Sena MLA : शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? शिंदेंची पहिली प्रतिक्रियाSachin Ahir on Eknath Shinde MLA : शिवसेनेचे 40 आमदार संपर्कात? सचिन अहिर यांचं मोठं वक्तव्यThackeray vs Shinde : निकालानंतर शिंदेंना धक्का? 5-6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात? Shiv Sena NewsSupriya Sule on Lok Sabha Result : विजयानंतर सुळेंनी घेतली अजितदादांच्या आईंची भेट, म्हणाल्या..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आले? राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याने केला खुलासा
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आले? राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याने केला खुलासा
Shivsena: लोकसभेला मदत करतो, विधानसभेला आमचा विचार करा; शिंदे गटातील आमदारांची ठाकरेंना ऑफर; सचिन अहिरांचा गौप्यस्फोट
लोकसभेला मदत करतो, विधानसभेला आमचा विचार करा; शिंदे गटातील आमदारांची ठाकरेंना ऑफर; सचिन अहिरांचा गौप्यस्फोट
Pandharpur Rain : पंढरपूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाची जोरदार बॅटिंग, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची तारांबळ
पंढरपूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाची जोरदार बॅटिंग, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची तारांबळ
Pathardi Bandh: पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट, युवक ताब्यात; आज पाथर्डी बंदची हाक
पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट, युवक ताब्यात; आज पाथर्डी बंदची हाक
सर्व्हेच्या नावे एकनाथ शिंदेंवर दबाव, खरे विलन चंद्रशेखर बावनकुळेच, अमित शहांना भेटून कारवाईची मागणी करणार : कृपाल तुमाने
सर्व्हेच्या नावे एकनाथ शिंदेंवर दबाव, खरे विलन चंद्रशेखर बावनकुळेच, अमित शहांना भेटून कारवाईची मागणी करणार : कृपाल तुमाने
मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव
मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव
NDA Government Cabinet: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला केंद्र सरकारमधील 'ते' ऐतिहासिक कॅबिनेट खातं येणार?
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला केंद्र सरकारमधील 'ते' ऐतिहासिक कॅबिनेट खातं येणार?
Vidhan parishad election 2024: कोकण पदवीधरमधून राज ठाकरेंच्या मनसेची माघार 'सशर्त'; वारंवार असं घडणार नाही, फडणवीसांचा राज ठाकरेंना शब्द
कोकण पदवीधरमधून राज ठाकरेंच्या मनसेची माघार 'सशर्त'; वारंवार असं घडणार नाही, फडणवीसांचा राज ठाकरेंना शब्द
Embed widget