एक्स्प्लोर

दोन गावांसाठी एक विहीर, भंडाऱ्यात तहान भागवण्यासाठी नागरिकांची पायपीट

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील येदरबुची आणि सुंदरटोला गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी गावापासून जवळपास एक किमी लांब असलेल्या विहिरीवर लोकांना जावं लागत आहेत.

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील येदरबुची आणि सुंदरटोला गावातील नागरिकांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील ग्रामस्थ पहाटे 3 वाजेपासून एक किलो मीटर दूर असलेल्या एका विहरीतून पाणी आणतात. गावालगत बावनथडी धरण असूनदेखील नियोजनाअभावी गावकऱ्यांना धरण उशाला, कोरड घशाला म्हणण्याची वेळ आली आहे.

येदरबुची गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. गावात पाच ठिकाणी सार्वजनिक हात पंप आहेत, मात्र त्या पंपांनाही पाणी येत नाही. जिल्हा प्रशासनच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 30 हजार लिटरचे जलकुंभ तयार करण्यात आले आहे. मात्र आठवड्यातून फक्त एकदा 30 हजार लिटरचा जलकुंभ अर्धा भरला जातोय.

गावापासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात असलेल्या विहिरीला थोड्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे गावातील सर्व नागरिकांना पहाटे 3 वाजेपासून या विहिरीवर पाणी भरण्याकरिता रांगा लावाव्या लागतात. अशारीतीने येदरबुजीतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सर्व गावकरी एकत्र पाणी भरत असल्यामुळे या विहिरीचं पाणी गढूळ होत आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने गावातील लोकांना याच पाण्याचा पिण्याकरिता वापर करावा लागत आहे. अनेकदा नागरिकांना स्वयंपाकासाठीही पाणी मिळत नाही, असं गावकरी सांगतात.

येदरबुची आणि सुंदरटोला गावजवळील तलावातील गढूळ पाणी पाजून ग्रामस्थ जनावरांची तहान भागवत आहेत. तर दुसरीकडे गावात घरकुल योजनेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या अनेक घरांची कामं पाण्याअभावी बंद पडली आहेत. याठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nandi Sammelan Dombivli : साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget