Devendra Fadanvis : 4 राज्यांत 22 सभा आणि रोड शो, स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश, देवेंद्र फडणवीसांचे झंझावाती दौरै
Devendra Fadanvis Campaign In Assembly Election : चार राजांच्या निवडणुकीच्या प्रचार यादीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला होता. त्याप्रमाणे त्यांनी झंझावती दौरे केले.
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल येत्या 3 डिंसेबर रोजी लागणार आहे, त्यामुळे मिनी लोकसभेसाठी (Lok Sabha Election) लोकांचा कौल कुणाकडे आहे याचा अंदाज मिळण्याची शक्यता आहे. पण या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि नियोजनामध्ये महाराष्ट्राच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे. त्यांनी पाचपैकी चार राज्यांमध्ये 22 सभा आणि रोड शो केले.
एखाद्या झंझावताप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये प्रचार केला. या राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देवेंद्र फडणवीसांचे नाव होतं. फडणवीसांनी त्यांच्या राजकीय नेतृत्वाला शोभेल असाच झंजावती प्रचार केला, भाषणं केली आणि विरोधकांचा समाचार घेतला.
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चारही राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या आतापर्यंत 22 सभा आणि रोड शो झालेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानात स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचं नाव होतं. या पूर्वी यापूर्वी बिहार, गोवा येथे निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणीसांनी काम केलं. त्या दोनही राज्यांमध्ये निवडणुकीनंतर भाजपचे सरकार आलं होतं. नंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भूमिका बदलली आणि राजदसोबत युती केली. गोव्यामधील भाजपची सत्ता कायम आहे.
देवेंद्र फडणवीसांचे दौरे आणि सभा
मध्यप्रदेश
18 सप्टेंबर, 10 आणि 15 नोव्हेंबर असे 3 दिवस
आतापर्यंत 3 दौरे
धार, इंदोर, महू, बुरहानपूर, पांढुर्णा, सौंसर या ठिकाणी एकूण 8 सभा आणि रोड शो
छत्तीसगड
30 ऑक्टोबरला 1 दिवस, आतापर्यंत 1 दौरा
धमतरी, रायपूर येथे 2 सभा आणि रोड शो झाले.
राजस्थान
14 सप्टेंबर, 23 नोव्हेंबर असे 2 दिवस, आतापर्यंत 2 दौरे.
केसरी, नासिराबाद, किशनगड, अजमेर उत्तर, सांगानेर, आदर्शनगर येथे एकूण 7 सभा
तेलंगणा
21 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर
डोमलगौडा, हैदराबाद येथे रोड शो, नरसामपेट, देवलकोंडा, पालाकुर्ती येथे सभा आणि रोड शो
एकूण : 5
पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी
पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असून मिझोरममध्ये आणि छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. आता 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणा राज्यामध्ये मतदान होत आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल हा 3 डिसेंबर रोजी लागणार आहे.
ही बातमी वाचा: