एक्स्प्लोर

नांदेड देगलूर पोटनिवडणूक: मतमोजणी सुरू, भाजपला काँग्रेस धोबीपछाड देणार?

Deglur Biloli assembly By Election Results : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतली आहे.

Nanded Deglur Biloli By Election Results :  भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केलेली देगलूर पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतली आहे. तर, भाजप उमेदवार सुभाष साबणे हे पिछाडीवर आहे. मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर अंतापूरकर यांनी 7768 मतांनी आघाडी घेतली आहे. 

पोटनिवडणुकीची मतमोजणी 30 फेऱ्यापर्यंत पार पडणार आहे. एकूण 12 उमेदवार या निवडणुकीत उभे होते. शनिवारी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. जवळपास 64 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. 

याआधी पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला होता. पंढरपूरच्या निकालाची पुनरावृत्ती होईल, असा दावा भाजपच्या गोटातून करण्यात येत होता. भाजपने शिवसेनेचे सुभाष साबणे यांना निवडणुकीची उमेदवारी देऊन महाविकास आघाडीला धक्का दिला होता. मात्र, भाजपचा हा डाव यशस्वी होणार नसल्याचे काँग्रेसने म्हटले होते. निवडणुकीच्या आधी शिवसेनेत असलेले सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना प्रवेश केल्यानंतर उमेदवारीही मिळाली तर दुसरीकडे काँग्रेसनं दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना संधी दिली.

वर्ष 2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर 89 हजार 400 मताधिक्य मिळून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 560 तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार रामचंद्र भरांडे यांना 13 हजार 300 इतकी मते मिळाली होती. 

दिग्गजांच्या प्रचारसभा

 या निवडणुकीत प्रचारासाठी दिग्गजांनी हजेरी लावली आणि विजयाचा दावा केला आहे. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या अनेक दिग्गजांच्या सभा पार पडल्यात तर महाविकास आघाडीकडून मंत्री अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. वंचितकडून प्रकाश आंबेडकरांनी देखील सभा घेतल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येवरून सर्वपक्षीय एल्गार, धनंजय मुंडेंवर वार ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 04 January 2024Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 04 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Embed widget