एक्स्प्लोर

ED : हसीना पारकरचे अखेरपर्यंत दाऊदसोबत आर्थिक व्यवहार; नवाब मलिकांसोबत काय संबंध? मुलाने ईडीला दिलेल्या जबाबात माहिती समोर

ED : ईडीने दिवंगत हसीना पारकरचा मुलगा अलीशाह इब्राहिम पारकर याचा जबाब नोंदवला होता. यात ही माहिती समोर आली आहे.

ED : हसीना पारकर अखेरपर्यंत दाऊदसोबत आर्थिक व्यवहार करत होती. 21 फेब्रुवारी 2022 रोजी, ईडीने पीएमएलए कायद्याच्या कलम 50 अंतर्गत दिवंगत हसीना पारकरचा मुलगा अलीशाह इब्राहिम पारकर याचा जबाब नोंदवला होता. यात ही माहिती समोर आली आहे. अलीशाह सांगितले की, त्याची आई हसीना पारकर ही दाऊद इब्राहिमची बहीण असल्याने ती समाजातील एक दरारा असलेली व्यक्ती होती. हसीना आपा म्हणून त्या ओळखल्या जात असून मालमत्तेशी संबंधित वाद मिटवत होत्या. दाऊद इब्राहिमशी तिच्या आईच्या संबंधांबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की त्यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध आहेत. ते वारंवार बोलायचे आणि संवाद साधायचे. 

हसीना पारकरचे दाऊद इब्राहिमशी संबंध
ईडीने आरोपपत्रात हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर, दाऊद इब्राहिमचा मेहुणा सौद युसूफ तुंगेकर, छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, इक्बाल कासकर, इक्बालचा सहकारी खालिद उस्मान शेख आणि सरदार खानचे यांचे जबाब घेण्यात आले. सर्वांच्या जबाबवरून हे सिद्ध झालं की, हसीना पारकरचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत आणि कुर्ल्यातील मालमत्तेची मालकी तिच्याकडे असल्याचे उघड झाले आहे.

कुर्ल्यातील मालमत्तेची मालकी कोणाकडे? नवाब मलिकांसोबत व्यवहार?
कुर्ल्यातील गोवाला इमारतीत हसीना पारकर आणि सलीम पटेल यांनी वाद मिटवल्याचे अलीशाहने सांगितले. नंतर त्यांनी तेथे कार्यालय सुरू करून कंपाऊंडचा काही भाग ताब्यात घेतला. मालमत्तेशी संबंधित वादाचे स्वरूप त्याला माहीत नाही. आईच्या वतीने सलीम पटेल कार्यालयात बसून गोवाला कंपाऊंडचा कारभार सांभाळत असत. नंतर तिची आई हसीना पारकर यांनी तिच्या ताब्यात असलेला भाग नवाब मलिकला विकला. नवाब मलिकने तिच्या आईला दिलेल्या मोबदल्याबद्दल त्याला माहिती नाही. मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूटचे जबाब ईडीने 15 फेब्रुवारी 2022 रोजी नोंदवले होते. तो छोटा शकीलचा मेहुणा आहे. छोटा शकील हा ज्ञात गुंड सुपारी किलर असून तो गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवत असे. छोटा शकील पाकिस्तानातून काम करतो आणि दाऊद इब्राहिमच्या टोळीत काम करतो, असे त्याने सांगितले.

मालमत्तेच्या व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याचे सिद्ध
मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात गुंड दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर यांच्यातील करार सिद्ध झाला होता. 5000 पानांच्या आरोपपत्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या लोकांसोबत मालमत्तेच्या व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याचे सिद्ध झाले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर, तिचा अंगरक्षक सलीम पटेल आणि 1993 बॉम्बस्फोटातील दोषी सरदार शाह वली खान यांच्या संगनमताने हे व्यवहार केले गेले. 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget