Turtle smuggling : कल्याणमध्ये वनविभागाची मोठी कारवाई, श्रीमंतीच्या हव्यासापोटी कासव तस्करी वाढली; 7 कासव जप्त
Turtle smuggling In Kalyan : कासव पाळल्यास पैशांची चणचण भासत नाही. या अंधश्रद्धेतून कासव खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे
Turtle smuggling : कासव पाळल्यास पैशांची चणचण भासत नाही. या अंधश्रद्धेतून कासव खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी कासवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी वनविभागाने कल्याणमध्ये (Kalyan) मोठी कारवाई केलीय. दोन एनिमल पेट शॉपवर छापे मारत 7 कासव जप्त केले आहेत. या कासव विक्री करणाऱ्यांवर वनविभागाने कायदेशीर कारवाई केली आहे.
कासव घरात पाळणे हा एक गुन्हा
वन्यप्राणी असलेला कासव घरात पाळणे हा गुन्हा असून घरात कासव असल्याची माहिती मिळताच वन विभागाकडून कारवाई करत हे कासव जप्त करत त्यांना जंगलातील त्यांच्या अधिवासात सोडले जाते. मागील काही दिवसापासून वनविभागाला कल्याण डोंबिवलीतील एनिमल पेट शॉपमध्ये विक्रीसाठी कासव मोठ्या प्रमाणावर आणले जात असल्याच्या तक्रारी वनविभागाला प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमावर कल्याण वनविभागाने वन्यजीवांचा व्यापार करणार्या अनेक दुकानची झडती घेतली. यावेळी कल्याण मधील दोन एनीमल पेट शॉपमध्ये कासव विक्रीसाठी असल्याचे निदर्शनास आले.
तीन इंडियन टेंट टर्टल, 4 भारतीय स्टार कासव जप्त
वनविभागाकडून तत्काळ 3 इंडियन टेंट टर्टल, 4 भारतीय स्टार कासव जप्त करत या दोन्ही दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. चन्ने यांनी वन्यजीव अधिनियम 1972 नुसार कोणताही वन्यजीव घरी पाळणे किंवा त्यांचा व्यापार करणे कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, यामुळे घरात वन्यप्राणी पाळत त्यांच्या जीवाशी खेळू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Mumbai Crime : आधी भंडाऱ्यात जेवून नंतर करायचे बाईक चोरी, 9 बाईकसह भावोजी आणि मेहुणा अटकेत
- Aurangabad: पत्नीच्या औषधांचा खर्च झेपेना म्हणून त्याने चोरीचा मार्ग पत्कारला; पोलिसांच्या कारवाईत धक्कादायक माहिती
- Aurangabad: वीजपुरवठा खंडित झाला म्हणून थेट महावितरणच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्याला झोडपले