Aurangabad: वीजपुरवठा खंडित झाला म्हणून थेट महावितरणच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्याला झोडपले
Aurangabad News: सनीसेंटर येथील महावितरण कार्यालयात तिघांनी प्रचंड राडा घातल्याची घटना समोर आली आहे.
Aurangabad News: औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणचे अधिकारी कॉलला प्रतिसाद देत नसल्याच्या कारणावरुन थेट महावितरण कार्यालयात जाऊन तीघांनी उपस्थित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच समोर आलंय. तर याप्रकरणी अनोळखी तीघांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता सनीसेंटर येथील महावितरण कार्यालयात हि घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडको पोलिस ठाण्यात नितिन हिंमतराव शेवाळे (40 , रा. समृध्दी नगर) यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार, ते महावितरण मध्ये गेल्या बारा वर्षांपासून ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता ते कार्यालयात कर्तव्यावर होते. यावेळी वीजपुरवठा खंडित झाला म्हणत तीन तरुण कार्यालयात आले. इथे साहेब कोण आहे, आमची दुपार पासुन लाईट गेलीये, अशी विचारणा करू लागले. यावेळी शेवाळे यांनी उपस्थित असलेले सहाय्यक अभियंता आर. पी. राठोड यांचे नाव सांगितले.
त्यांनतर आलेल्या तीन तरुणांनी लगेच शिविगाळ सुरू करुन राठोड यांच्या संपर्क क्रमांकासाठी शेवाळे यांना धमकावले. त्यामुळे शेवाळे यांनी क्रमांक दिला मात्र राठोड यांनी कॉलला प्रतिसाद दिला नाही. याचाच राग आल्याने त्या तीन तरुणांनी अचानक राडा घालयला सुरवात केली. तू आमची लाईट ताबडतोब चालु करतो की नाही, येथे कशासाठी बसला, शासनाचा उगाचच पगार घेतो का, असे म्हणत शेवाळे यांची कॉलर पकडून शिविगाळ सुरू केली.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु...
हे तरूण एवढ्यावरच थांबले नाही, त्यानंतर त्यांनी शेवाळे यांना हाताचापटाने मारहाण केली. तेवढ्यात दुसऱ्या कर्मचाऱ्याने हस्तक्षेप करत त्यांची सोडवणूक केली. शेवाळे यांनी वरीष्ठांना हा प्रकार सांगितल्यानंतर 2 ऑगस्ट रोजी सिडको पोलिस ठाण्यात त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून या तिन्ही आरोपींचा शोध सुरु आहे.
घाटीतील डॉक्टराला मारहाण...
दुसऱ्या एका घटनेत औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या एका निवासी डॉक्टराला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. घाटीतील वार्ड क्रमांक 17 मध्ये हि घटना घडली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टर संघटनेकडून काम बंदची घोषणा करण्यात आली आहे. तर यावर घाटी प्रशासनाच्यावतीने महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून, याप्रकरणी कारवाईबाबत निर्णय घेण्याचे ठरवले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: आईला बाहेर पाठवून पित्याकडून लेकीवर अत्याचार, नात्याला काळीमा फासणारी घटना