Maharashtra Covid-19 Updates : राज्यात गेल्या 24 तासात 766 रुग्णांची नोंद तर 19 जणांचा मृत्यू
Maharashtra Covid-19 Updates : राज्यात सध्या 9,493 इतके सक्रिय रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.68 टक्के इतकं झालं आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत स्थिरता दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 766 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 929 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 64,77,379 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे 97.68 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही कमी झाली असून त्याचे प्रमाण हे 2.12 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील 85,335 रुग्ण हे होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1077 रुग्ण हे संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 9,493 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.
देशातील स्थिती
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव सुरुच आहे. दरम्यान, आता दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 7 हजार 579 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात 543 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात सध्या एक लाख 13 हजार 584 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात काल दिवसभरात कोरोनामुळे 12 हजार 202 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच या महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 66 हजार 147 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 46 हजार 749 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या :
- Coronavirus : पालकांची चिंता वाढली! गेल्या 20 दिवसांत राज्यातील हजाराहून जास्त मुलांना कोरोनाची लागण
- टास्क फोर्स आणि राज्य शासनानं बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी, मुंबई महापालिकेची भूमिका
- School Reopen : शाळा सुरु करण्याबाबत महापालिका अनुकूल तर मुलांच्या लसीकरणानंतर शाळा सुरु कराव्यात टास्क फोर्सचा आग्रह
Before You Go
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
महत्त्वाच्या बातम्या





















