एक्स्प्लोर

Maharashtra Coronavirus live Update: लॉकडाऊन शिथिल झाल्याने लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग : पल्लवी सापळे

राज्यातील विविध भागातील शेकडो विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वाशिम, सोलापूर, सातारा, लातूर अशा विविध भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

LIVE

Maharashtra Coronavirus live Update: लॉकडाऊन शिथिल झाल्याने लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग : पल्लवी सापळे

Background

Maharashtra Corona Update : राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील विविध भागातील शेकडो विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वाशिम, सोलापूर, सातारा, लातूर अशा विविध भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

वाशिममध्ये 229 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी हॉस्टेलमधील 229 विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश कोरोना बाधित विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. हॉस्टेलमध्ये सध्या एकूण 327 विद्यार्थी आहेत. हॉस्टेलला प्रशासनाने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि अधिकची चौकशी सुरू केली आहे.

सोलापुरात 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

क्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. काल काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर काल आणि आज दोन दिवस झालेल्या तपासणीत 43 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी ही माहिती दिली आहे.

साताऱ्यात 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव

सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या 16 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या 16 शाळातील 35 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. आता या शाळांतील इतर विद्यार्थांचीही कोरोना तपासणी करण्यात येत आहे. या 35 विद्यार्थ्यांमध्ये पाचवी ते आठवी या दरम्यानचे 25 विद्यार्थी तर नववी ते बारावीपर्यंतचे एकूण 10 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत.

लातूरमध्ये 45 विद्यार्थ्यांना कोरोना

लातूर शहरातील एमआयडीसी भागातील खासगी हॉस्टेलमधील 45 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. परवानगी नसतानाही शहरातील 170 पेक्षा जास्त खासगी हॉस्टेल सुरू असल्याने आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

साताऱ्यातील पुसेगावमधील 23 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

साताऱ्यातील पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयातील 23 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आहेत. सेवागिरी विद्यालयात पहिल्यांदा एक विद्यार्थीनी आजोबांमुळे कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. दुसऱ्या टप्प्यात या शाळेतील आणखी पाच विद्यार्थी पॉझिटीव्ह आढळले होते. तिसऱ्या टप्यात आणखी तीन विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले. चौथ्या टप्यात आणखी 14 विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले. आतापर्यंत सेवागिरी विद्यालयातील एकूण 23 विद्यार्थांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या टप्यात पाचवी ते आठवी या वर्गातील हे विद्यार्थी आहेत.

13:55 PM (IST)  •  25 Feb 2021

पूर्ण राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे लहान मुलांना देखील कोरोनाची बाधा होत असल्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. आतापर्यंत सुमारे 74 हजार 459 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली असून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर हे प्रमाण वाढले असून मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी बस किंवा ऑटो रिक्षातून मुलांना शाळेत न पाठवता स्वतः सोडवावे, तसेच मुलांना मास्क बंधनकारक करण्यात यावे, ज्येष्ठांकडून लहान मुलांना संसर्ग झाला असून कुटुंबात लहान मुलांची काळजी घ्यावी, लहान मुलांमध्ये लक्षणे जाणवल्यास त्यांना घरीच ठेवावे असे आवाहन जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे यांनी एबीपी माझाशी बोलताना केले.
13:17 PM (IST)  •  25 Feb 2021

साताऱ्यात 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव

सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या 16 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या 16 शाळातील 35 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. आता या शाळांतील इतर विद्यार्थांचीही कोरोना तपासणी करण्यात येत आहे. या 35 विद्यार्थ्यांमध्ये पाचवी ते आठवी या दरम्यानचे 25 विद्यार्थी तर नववी ते बारावीपर्यंतचे एकूण 10 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत.
13:16 PM (IST)  •  25 Feb 2021

सोलापुरात 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. काल काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर काल आणि आज दोन दिवस झालेल्या तपासणीत 43 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी ही माहिती दिली आहे.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget