एक्स्प्लोर

Maharashtra Corona Vaccination Process: कोविड लसीकरणाची ब्ल्यू प्रिंट 'माझा'च्या हाती, असा आहे लसीकरणाचा मेगाप्लान

Exclusive Corona Vaccination Mega Plan : कोरोनाचा प्रसार कमी होत चालला असताना काही ठिकाणी लसीकरण देखील सुरु झालं आहे. राज्यात देखील लसीकरणाची तयारी जोरदार सुरु आहे.राज्यातील कोविड लसीकरणाची ब्ल्यु प्रिंट माझाच्या हाती लागली आहे. या लसीकरणाचा मेगाप्लान कसा असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात....

Maharashtra Corona Vaccination Mega Plan Exclusive :   कोरोनाचा प्रसार कमी होत चालला असताना काही ठिकाणी लसीकरण देखील सुरु झालं आहे. राज्यात देखील लसीकरणाची तयारी जोरदार सुरु आहे. राज्यातील कोविड लसीकरणाची ब्ल्यु प्रिंट माझाच्या हाती लागली आहे. या लसीकरणाचा मेगाप्लान सरकारने तयार केला आहे. राज्यात लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्यांचं / टास्क फोर्सचं गठन करण्यात आलं आहे. राज्य पातळीवर मुख्य सचिवांच्या अंतर्गत State steering committe नेमण्यात आली आहे. राज्याच्या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच, राज्य पातळीवर लसीकरण मोहिमेसाठी कंट्रोल रुमही तयार करण्यात आली आहे.

टास्क फोर्सची निर्मिती जिल्हा पातळीवर अतिरिक्त आयुक्तांच्या अंतर्गत शहरांमधील टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलीय. स्थानिक पातळीवर सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत वॉर्ड टास्क फोर्सची निर्मिती करण्यात निती आयोगाअंतर्गत कोविड 19 लसीकरणासाठी प्रशासनातील राष्ट्रीय तज्ञ गटही केंद्र स्तरावरील समिती देशभरातील लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवणार आहे. लसीकरणाबाबतच्या महत्वाच्या निर्णयाचे आणि पॉलिसी ठरवण्याचे अधिकार या केंद्रीय स्तरावरील समितीला असतील.

टास्क फोर्स काय करणार? लसीकरणाच्या 3 टप्प्यांसाठी नोंदणी प्रक्रिया बघणे. लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना ट्रेनींग वेळेवर मिळते आहे का हे पहाणे वॅक्सिन साठवणूक आणि वाहतूक यावर लक्ष ठेवणे योग्य साधनसामग्री पुरवणे

तीन टप्प्यांमध्ये लस दिली जाणार 1 ला टप्पा- आरोग्य कर्मचारी- सव्वा लाख 2 रा टप्पा- फ्रंटलाईन वर्कर- जसे पोलिस, फायर ब्रिगेड, सफाई कर्मचारी, महापालिका कर्मचारी 3 रा टप्पा- 50 वर्षांवरील नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्ती

पहिला टप्पा कसा असेल पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जाईल

लस साठवण्याची आणि देण्याची केंद्रे 4 मेडिकल कॉलेज, 4 महापालिका रुग्णालये, 1 जम्बो कोल्ड स्टोरेज सेंटर प्रत्येक केंद्रावर 3 टीम 2 शिफ्ट मध्ये काम करतील एका सेंटरवर दररोज 1200 लोकांना लस दिली जाईल...

पहिल्या टप्प्यात 15 ते 20 दिवसांत 1 लाख 25 हजार लोकांना लस टोचणे लसीच्या पहिल्या डोस नंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल

दुसरा टप्पा कसा असेल फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी प्रक्रीया पूर्ण केली जाईल. यासाठी नोडल ऑफिसर-सबनोडल ऑफिसर नेमले जातील लसीकरणाची केंद्र हॉस्पिटल्स, शाळा, कम्युनिटी हॉल अशी असतील प्रत्येक केंद्रावर पोलिस, बेस्ट आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी नेमलेले असतील

तिसरा टप्पा कसा असेल

तिसऱ्या टप्पा आव्हानात्मक. कारण लस घेणाऱ्यांची संख्या मोठी

नोंदणीची प्रक्रिया खूप मोठी असेल. यासाठी हेल्थ पोस्ट तयार केले जातील

लसीकरणाची केंद्र हॉस्पिटल्स, शाळा, कम्युनिटी हॉल, हेल्थ पोस्ट, डिस्पेन्सरी अशी असतील

कोविड वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्कची उभारणी

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत इलेक्ट्रॉनिक वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क उभारण्यात आले आहेत. आयआयटी दिल्लीकडून हे इंटेलिजन्स नेटवर्क उभारण्यात आले आहे

इंटेलिजन्स नेटवर्क काय करणार लसीकरण योग्य वेळेत पूर्ण होतेय की नाही हे पाहण्यासाठी रिअल टाईम ट्रॅकिंग करणार लसीच्या साठवणुकीवर लक्ष ठेवणार

लसीकरण केंद्रांचा सेटअप कसा असेल

लसीकरणासाठी येण्या जाण्याचे दोन मार्ग असतील मोठ्या खिडक्या - मोकळ्या हवेसाठी वेटींग रुप, लसीकरणाची खोली, लसीकरण झाल्यानंतर निरीक्षणासाछी निरीक्षण खोली असेल सामाजिक अंतर पाळले जाईल अशी व्यवस्था केंद्रावर परवानगीशिवाय प्रवेश नाही

वेगवेगळ्या संस्थांचे रोल काय? महिला व बालकल्याण विभाग आंगणवाडी सेविकांकडून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन घेणे संपूर्ण प्रक्रियेकरता वेगवेगळ्या ठिकाणी निरीक्षक नेमणे

शिक्षण विभाग दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी शाळांमध्ये जागा उपलब्ध करुन देणे शिक्षा मित्र आणि शिक्षकांना लसीकरण मोहिमेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमणे

क्रीडा व युवक विभाग एनएसएस आणि एनसीसीकडून लोकांपर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचवण्यासाठी मदत घेतली जाईल एनसीसीकडे लसीकरण केंद्रांवरील व्यवस्थापन आणि गर्दीचे व्यवस्थापन ही जबाबदारी दिली जाईल

गृह विभाग लसीकरण मोहिमेदरम्यान शांतता सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान जनजागृतीसाठी होम गार्ड नियुक्त केले जातील

जगभरातील लसीकरण मोबिम चांगल्या पद्धतीनं पार पडण्यासाठी नियोजन, प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आणि लसीकरणाबाबतच्या प्रतिक्रिया कशा आहेत याचा आढावा घेण्याचं काम WHO करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
×
Embed widget