(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 103 कोरोना रुग्णांची नोंद तर 77 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 103 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 77 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात 103 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 745 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 77 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 103 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 98, 01, 282 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 745 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 745 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 346 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 50 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात 1 हजार 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
देशात सध्या कोरोनाचा धोका कमी झाल्याचे चित्र आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 818 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 1 हजार 88 कोरोना रुग्णांची नोंद झाला होती तर, 26 जणांचा मृत्यू झाला होता. आज रुग्णसंख्येत किंचीत घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 58 इतकी झाली आहे. काल दिवसभरात 818 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 736 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 06 हजार 228 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. दरम्यान, सध्या देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.23 टक्के इतका झाला आहे.