(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर, गुरुवारी 2 हजार 797 नव्या रुग्णांची भर
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाच्या 2 हजार 797 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 6 हजार 383 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 2 हजार 797 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दोन दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 383 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आतापर्यंत 4456 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 3334 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज 40 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 40 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 81 हजार 961 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 51 हजार 023 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1146 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 68 लाख 76 हजार 774 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 115 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 255 रुग्णांपैकी 23 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत 259 नवे कोरोनाबाधित
मुंबईत (Mumbai) आज 259 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या (Corona Updates) चारने वाढली आहे, कारण मंगळवारी 255 नव्या बाधितांची नोंद झाली होती. सलग तिसऱ्या दिवशी आजही मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 202 दिवसांची वाढ झाली आहे. कारण मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2205 इतका होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus : भारतात कोरोनामुळे 30 लाखांपेक्षा जास्त मृत्यू?, केंद्र सरकारने दिले उत्तर
- कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र
- कोरोनाची लाट मावळू लागल्यानंतर औरंगाबादमध्ये 'कोरोना भगाव मशीन', लाखोंचा खर्च करुन बसवलं मशीन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha