(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 169 कोरोना रुग्णांची नोंद तर 172 कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार होताना दिसत आहे. रविवारी राज्यात 169 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 995 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 172 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एका कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,29, 063 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 8,02,12, 310 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 995 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 995 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 628 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात 209, ठाण्यात 75 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशातील कोरोनाच्या संसर्गात किंचित घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 3324 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 40 जणांचा मृत्यू आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 2876 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 झाली आहे. काल 3688 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 50 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 92 इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात 2876 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 40 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 36 हजार 253 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात देशात 4 लाख 71 हजार 87 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.