Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 138 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 137 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 138 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 137 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 893 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.आज राज्यात 138 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 137 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24, 697 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 92, 08, 961 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 893 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 893 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 252 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 159 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट
देशात आज कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1660 नवीन रुग्ण आढळले असून 4100 लोकांचा मृत्यू झाला आहे (या मृत्यूंमध्ये काही राज्यांमधील आधी नोंद न झालेल्या मृत्यूंचा समावेळ आहे). काल 1660 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 16 हजार 372 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशात 2 हजार 349 रुग्ण कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 741 झाली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha