एक्स्प्लोर

आम्हाला बदनाम करू नका; गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणाने चर्चा, मंगला बनसोडेंनी सांगितला तमाशा अन् कला केंद्रातील फरक

सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रात चार भिंतीमध्ये कार्यक्रम असतो तर लोकनाट्य तमाशामध्ये शंभर कलावंत असतात आणि ते त्यांची कला हजारो रसिकांसमोर सादर करतात.

सातारा : सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका विवाहित युवकाने नर्तिकेच्या नादात स्वत:चं आयुष्य संपवलं. या घटनेनं सोलापूरसह बीड जिल्हाही हादरला होता. कारण, बीड जिल्ह्यातील गेवराईच्या एका गावचा माजी उपसरपंच राहिलेल्या गोविंद बर्गेने पूजा गायकवाड (Pooja gaikwad) हिच्या नादात जीव दिला, आपलं कुटुंब पोरकं गेलं. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती, तसेच पूजा गायकवाडला नेटीझन्स आणि गोविंद बर्गेच्या ग्रामस्थांकडून लक्ष्य करण्यात आलं. गोविंदच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनंतर पूजाविरुद्ध गुन्हा दाखल करत तिला अटकही करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे राज्यात गावखेड्यात सुरू असलेल्या कला केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील वेश्याव्यवसाय आणि अवैध धंद्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे, कला केंद्र आणि तमाशा (Tamasha) यातील फरक सांगत तमाशा कलावंत मंगला बनसोडे (Mangala bansode) यांनी आम्हाला बदनाम करू नका, अशी खंत व्यक्त केलीय.

सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रात चार भिंतीमध्ये कार्यक्रम असतो तर लोकनाट्य तमाशामध्ये शंभर कलावंत असतात आणि ते त्यांची कला हजारो रसिकांसमोर सादर करतात. वयाच्या 7 व्या वर्षापासून ते आजपर्यंत हजारो रसिकांसमोर मी कला सादर केली. त्यावेळी रसिकांनी देखील आम्हाला न्याय दिला, आमच्यावर प्रेम केलं. त्यामुळेच मला आणि माझ्या आईला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, असे परखड मत तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी मांडले. सध्या सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे कला केंद्रातील नर्तिकेच्या वेडापायी गोळी झाडून घेत आत्महत्या केलेल्या गोविंद बर्गे या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ होत आहे. त्यामध्ये, नर्तिका असलेल्या पूजा गायकवाड आणि कला केंद्रावर टीका होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तमाशा आणि कला केंद्र यातील फरक मंगला बनसोडे यांनी सांगितला आहे.

कला केंद्र आणि तमाशा हे वेगळे आहेत, कला केंद्रामुळे आमचा तमाशा बदनामी करू नये, असे आवाहन देखील मंगला बनसोडे यांनी केले आहे. तमाशा आणि कला केंद्र यामध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. तमाशामध्ये लोककला, समाज प्रबोधन हे कलाकार हजारो प्रेक्षकांसमोर दाखवत असतात. त्यामुळेच, शासनासह रसिकांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे कला केंद्र ही वेगळी बाजू आहे आणि लोकनाट्य कला म्हणजेच तमाशा ही वेगळी बाजू आहे, असे म्हणत पारगावच्या कला केंद्रातील घटनेनंतर तमाशाला बदनाम केलं जात असल्याची खंत लोकनाट्य कलाकार मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

85 कोटींचा अपहार, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या मुलास जीवे मारण्याची धमकी; क्राइम ब्रँचकडून राजेंद्र लोढास अटक

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget