Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाचा आलेख उतरणीला, मंगळवारी 675 रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी कोरोनाच्या 675 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 1 हजार 225 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 675 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 225 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 104 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 104 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4733 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4509 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 202 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 12 हजार 568 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.04 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 31 हजार 412 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 663 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 79 लाख 40 हजार 925 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 77 नवे कोरोना रुग्ण
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 77 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 135 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 757 इतकी झाली आहे. मुंबईच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 77 रुग्णांपैकी 15 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 35 हजार 932 बेड्सपैकी केवळ 692 बेड वापरात आहेत. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा दरही वाढत आहे. आज हा दर 5279 वर पोहोचला आहे.
- New Unlock Guidelines : आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी केंद्राकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी, वाचा नव्या मार्गदर्शक सूचना
- टास्क फोर्सचा मोठा दिलासा, Omicron BA.2 मुळे कोरोनाची पुढची लाट येणार नाही!
- Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा