Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 124 रुग्णांची नोंद तर 113 कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 124 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 113 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) हळूहळी वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बुधवारी राज्यात केवळ 124 रुग्णांचे निदान झाले आहे. कालपेक्षा आज रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 724 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 41 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 113 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एक कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 903 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 97, 60, 948 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 724 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 724 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 331 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 43 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात 1088 कोरोना रुग्णांची नोंद
देशात कोरोना विषाणूच्या संसर्गात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1088 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजार 870 इतकी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात 1 हजार 81 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 736 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 5 हजार 410 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.25 टक्के इतका झाला आहे.