Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,640 रुग्णांची नोंद तर तीन जणांचा मृत्यू
Coronavirus : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.83 टक्क्यावर पोहोचला आहे तर मृत्यूदर 1.85 टक्के इतका झाला आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सध्या साडेतीन हजाराच्या घरात स्थिर असल्याचं चित्र आहे. आज राज्यात कोरोनाच्या 3640 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 4432 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आतापर्यंत 78,03,249 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर राज्यात आज तीन मृत्यू झाले असून मृत्यूदर हा 1.85 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात आज सक्रिय रुग्णसंख्या ही 24,940 इतकी झाली आहे. सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत असून ती संख्या 10,630 इतकी आहे.
देशातील स्थिती
देशातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढून एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे. ही चिंताजनक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 819 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात 39 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या 1 लाख 4 हजार 555 सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत.
देशात एक लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण
देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 555 इतकी झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 13 हजार 827 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.