(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : कोरोनाचा वेग वाढतोय, बुधवारी राज्यात आढळले 1 हजार पेक्षा जास्त रुग्ण, मुंबईने टेन्शन वाढवलं
Maharashtra Corona Update : सक्रीय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मुंबईने सर्वाधिक टेन्शन वाढवले आहे. राज्यातील 70 टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत.
Maharashtra Corona Update : कोरोना संपलाय, असे म्हणत असाल तर आज राज्याची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्याने बुधवारी एक हजारांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे राज्याचं टेन्शन वाढत चाललेय. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सक्रीय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मुंबईने सर्वाधिक टेन्शन वाढवले आहे. राज्यातील 70 टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागील चार पाच दिवसात राज्यातील कोरोनाची आकडेवारी वाढली आहे. सक्रीय रुग्णसंख्या चार हजार पार गेली आहे. बीए 4 आणि बीए 5 व्हेरीयंट जास्त वेगाने पसरत असल्याचं तज्ज्ञांचं निरीक्षण, मात्र धोका नाही असेही सांगिलेय.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात एक हजार 81 नवे रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासांत एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. तर 524 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के इतके झालेय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,09,51,360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,88,167 (09.74 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या चार हजार 32 सक्रीय रुग्ण आहेत.
मुंबईने टेन्शन वाढवले -
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात एक हजार 81 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. राज्याच्या 70 टक्के रुग्ण एकट्या मुंबईमध्ये आढळले आहेत. त्यामुळे मुंबईने राज्याचे टेन्शन वाढलेय. मुंबईत बुधवारी 739 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ठाणे मनपा 51, नवी मुंबई मनपा 84, वसई विरार मनपा 15, रायगड 17, पनवेल 18, पुणे मनपा 68, पिंपरी चिंचवड मनपा 10 आणि मीरा भाईंदर मनपा 17 कोरोना रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यातील इतर ठिकाणी कुठेही दुहेरी रुग्णसंख्या आढळली नाही.
मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण -
राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या चार हजार 32 इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहेत. मुंबईत 2970, ठाणे 452 आणि पुण्यात 357 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या दुहेरी आहे. तर नंदूरबार, धुळे, लातूर, परभणी, अकोला, बुलढाणा आणि गोंदियामध्ये एकही सक्रीय रुग्ण नाही.