Corona update : मिरजमध्ये एकाच महाविद्यालयातील 82 जणांना कोरोनाची लागण, ओमायक्रॉनची तपासणी होणार
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील (Miraj Medical College) 82 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

सांगली : ओमायक्रॉनच्या (Omicron) भीतीने राज्यभर निर्बंध वाढवले जात असताना सांगली जिल्ह्यातील कोरोना (Corona) पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढू लागला आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील (Miraj Medical College) 82 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील पॉझिटिव्ह रूग्णांचा कालपर्यंतचा आकडा 32 होता. त्यात आज आणखी 50 नव्या रूग्णांची भर पडली. पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमधील बहुतांश विद्यार्थिनी असून काही शिकाऊ डॉक्टरांचा देखील समावेश आहे. सर्वांना कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. यातील काही अहवाल ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत.
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या व मुला-मुलींच्या वसतिगृहात वास्तव्य करीत असलेल्या 210 जणांचे स्वॅब करोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालापैकी 82 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 50 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
करोना संसर्ग झालेल्या सर्वच रुग्णांचे स्वब ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पुणे व दिल्ली प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्यास अद्याप दोन ते तीन दिवस लागतील. बाधित रुग्णांना कोव्हीड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना करोनाची कोणतीही तीव्र लक्षणे नसल्याचे डॉ. रुपेश शिंदे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या























