Maharashtra Corona Update : दिलासादायक! कोरोना रूग्णांमध्ये मोठी घट, आठवडाभरात 211 रूग्णांची नोंद, एका बाधिताचा मृत्यू
Maharashtra Corona Update : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात म्हणजे 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत 293 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन 5 डिसेंबर 2022 ते 11 डिसेंबर या कालावधीत 211 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.
Maharashtra Corona Update : राज्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. कोरोना (Corona) महामारीच्या विळख्यातून हळू-हळू सुटका होत आहे. अलीकडील काही दिवसांतील नव्या रूग्णांची आकडेवारी पाहता देशासह राज्याला दिलासादायक बाब आहे. गेल्या दोन आठवड्याच्या आकडेवारीचा विचार केला तर या आठवड्यात तब्बल 27. 99 टक्के कोरोना रूग्णांमध्ये घट झाली आहे. यापेक्षा दिलासादायक बाब म्हणजे या आठवड्यात संपूर्ण राज्यातून फक्त एका कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेलेल्या आठवड्यात म्हणजे 5 डिसेंबर 2022 ते 11 डिसेंबर या कालावधीत 211 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात म्हणजे 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत 293 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन 5 डिसेंबर 2022 ते 11 डिसेंबर या कालावधीत 211 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दोन आठवड्याची आकडेवारी पाहता या आठवड्यात 27.99 टक्के घट झालेली आहे. तर कोरोनाचा साप्ताहिक मृत्यू दर हा 0. 47 टक्केंवर पोहोचला आहे. या आठवडयामध्ये प्रयोगशाळा चाचण्यांची पॉझिटीव्हीटी 0.46 टक्क्यांवरुन 0.3 टक्क्यांवर आलेली आहे. राज्यातील पुणे, जालना आणि अहमदनगर या जिल्ह्यांची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी एकपेक्षा जास्त आहे. या सर्व दिलासादायक गोष्टींसह रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या तसेच आयसीयुमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांमध्ये नियमितपणे घट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या आठवडयात एकही नवीन रुग्ण व्हेंटिलेटरवर भरती झाला नाही. तर फक्त एक रुग्ण ऑक्सिजन बेडवर भरती झालाय.
Corona Update : राज्यात आज 15 नव्या रूग्णांची नोद
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात केवळ 15 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. तर आज 20 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,87,595 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98. 17 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात आज एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.82 टक्के एवढा आहे.
Corona Update : देशातील स्थिती
देशभरातील विचार केला तर गेल्या 24 तासांमध्ये एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही. देशातील मृत्यूदर 1.19 टक्के आहे. देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात घट होत आहे. 24 तासांत देशातील फक्त सहा राज्यांमध्येच कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. इतर राज्यात एकाही नव्या कोरोना रूग्णाची नोंद झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या
कॅगकडून मुंबई महापालिकेच्या कोरोना कामांच्या खर्चाची चौकशी नाही? मनसेकडून सखोल चौकशीची मागणी