Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट, जाणून घ्या ताजी आकडेवारी
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे 15,140 नवीन रुग्ण आढळून आले, हे एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा 7304 कमी आहेत.
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. सोमवारी राज्यात कोरोना विषाणूचे 15,140 नवीन रुग्ण आढळून आले, हे एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा 7304 कमी आहेत. तर, आणखी 39 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 77 लाख 21 हजार 109 वर पोहोचली आहे, तर राज्यात 1 लाख 42 हजार 611 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
महाराष्ट्रात सध्या 2,07,350 सक्रिय कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 35,453 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत 73,67,259 लोक बरे झाले आहेत. तर, महाराष्ट्रात सध्या 2,07,350 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. याशिवाय सोमवारी ओमायक्रॉन प्रकाराच्या नवीन 91 रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारीनंतर राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या एकूण 3221 झाली असून त्यापैकी 1,682 रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण
पुण्यात गेल्या 24 तासात 3762 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 7953 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 14 जणांचा मृत्यू झाला. तर, पुण्यात एकुण सक्रिय रुग्णांची संख्या 59 हजार 204 वर पोहोचली आहे. त्यापैकी 56 हजार 887 प्रकरणे होम आयसोलेटेड आहेत. तसेच आतापर्यंत 19 हजार 475 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांमध्ये घट
मुंबईत गेल्या 24 तासात 960 रुग्ण आढळले आहेत. यात लक्षणे नसलेली 835 रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 47 हजार 590 वर पोहोचली आहे. सोमवारी नोंदवलेल्या रुग्णांपैकी 106 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 30 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. पालिकेने सांगितले की, मुंबईत सध्या 2215 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी 973 ऑक्सिजनवर आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Guidelines : आजपासून राज्यातील निर्बंध शिथील; काय सुरु, काय बंद?
- Maharashtra School Colleges Start: आजपासून राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेज अनलॉक; नियम पाळावेच लागणार
- मोठी बातमी : चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha