Video: छतावरून हेलिकाॅप्टर टेक ऑफ करताच पत्त्याच्या बंगल्यासारखी चार मजली कोसळली; इंडियन आर्मीनं शेअर केला थरकाप उडवणारा व्हिडिओ
Indian Army Helicopter Rescue Operation: छतावरून उड्डाण केल्यानंतर इमारतीचा पुढचा भाग पाण्यात बुडाला. त्यानंतरही, लष्कराने जीर्ण इमारतीच्या छतावर अडकलेल्या सर्व लोकांना वाचवले.

Indian Army Helicopter Rescue Operation: पंजाबमधील पठाणकोट येथील माधोपूर हेडवर्क्स येथे पुराच्या पाण्याने वेढलेल्या एका जीर्ण इमारतीतून लष्कराने 22 सीआरपीएफ जवान आणि 3 नागरिकांना वाचवले. बचावासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर जीर्ण इमारतीच्या छतावर उतरले. छतावरून उड्डाण केल्यानंतर इमारतीचा पुढचा भाग पाण्यात बुडाला. त्यानंतरही, लष्कराने जीर्ण इमारतीच्या छतावर अडकलेल्या सर्व लोकांना वाचवले. भारतीय लष्कराने बचाव कार्याचा व्हिडिओ एक्स वर शेअर केला आहे.
Indian Army Aviation undertook a high-risk helicopter rescue operation, evacuating stranded civilians and #CRPF personnel from a building surrounded by raging floodwaters and at imminent risk of collapse at Madhopur Headworks, #Punjab. Braving challenging weather and rapidly… pic.twitter.com/8999qBrs0x
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) August 27, 2025
30 ऑगस्टपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश
पंजाबमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांमधून पाणी सोडल्यामुळे बुधवारी पठाणकोट, गुरुदासपूर, तरणतारन, होशियारपूर, कपूरथला, फिरोजपूर आणि फाजिल्का येथे पूर आला. गुरुदासपूरच्या डाबुरी येथील नवोदय विद्यालयात 400 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक पुरात अडकले. शाळेचा तळमजला 5 फूट पाण्याने भरला आहे. मुलांना पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराच्या पथकांना पाठवण्यात आले आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे आज 30 ऑगस्टपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रावी नदीच्या पुरामुळे, कर्तारपूर साहिब कॉरिडॉर देखील 7 फूट पाण्याने भरला आहे. यामुळे पाकिस्तानचा श्री कर्तारपूर साहिब गुरुद्वारा देखील बुडाला आहे. कर्तारपूर कॉरिडॉर हा ४.७ किमी लांबीचा रस्ता आहे जो भारतातील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानमधील कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला थेट जोडतो. 9 नोव्हेंबर 2019 रोजी त्याचे उद्घाटन झाले.
इतर महत्वाच्या बातम्या























