Maharashtra Corona Update : राज्यात आज 1172 रुग्णांची नोंद तर 20 जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.57 टक्के इतकं झालं असून मृत्यू दर 2.12 टक्क्यांवर आला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1,172 नवीन रुग्णांची भर पडली आहे तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1,399 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.57 टक्के इतकं झालं आहे तर मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात सध्या 16,658 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 1,65,826 जण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 837 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत 6,26,67,211 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3432 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (1), धुळे (6), जालना (23), लातूर(82), परभणी (32), हिंगोली (19), नांदेड (24), अकोला (17), अमरावती (17), वाशिम (03), बुलढाणा (07), नागपूर (74), यवतमाळ (06), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (2), चंद्रपूर (17) आणि गडचिरोली (03) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
मुंबईत 315 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 315 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 429 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,33,318 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट हा 97 टक्के इतका झाला आहे. मुंबईत 3849 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर हा 1567 दिवसांवर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या :