Maharashtra Corona Curfew LIVE UPDATES : पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 9957 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
Break The Chain Live UPDATES Maharashtra COVID-19 restrictions : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी म्हणजेच, काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' (Break The Chain) असं नाव देण्यात आलं आहे.
LIVE
Background
Break The Chain Luve UPDATEs Maharashtra COVID-19 restrictions : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बुधवारी म्हणजेच, काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. आज ब्रेक द चेन (Break The Chain) या निर्बंधाचा पहिला दिवस आहे. पुढील 15 दिवस म्हणजे 1 मे पर्यंत राज्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.
नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 'ब्रेक द चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. निर्बधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही : पोलीस महासंचालक
राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत काल (बुधवारी) पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही. मात्र जर पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण मात्र सांगावं लागणार आहे. पुढे बोलताना पोलीस महासंचालक म्हणाले की, या काळात अनेक दुकान बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. परिस्थिति कठिण आहे. लोक जर बाहेर निघत असतील तर त्यांना आधी विचारलं जावं. विनाकारण मारहाण किंवा चार्ज लावू नये असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसेच ते म्हणाले की, जर कुणी कायद्याची पायमल्ली करत असेल. सार्वजनिक संपत्तीची नासधुस करत असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई होणार. आमची विनंती आहे की, आपण आपली स्वतःची काळजी घ्या. मास्क घाला. पोलीस आपल्या बरोबर आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 9957 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 9957 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर तब्बल 114 कोरोना बाधितांचा आज मृत्यू झालाय. हे एका दिवसात झालेले आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू आहेत. मागील काही दिवसांपासून एंशी ते नव्वद मृत्यू एका दिवसात नोंद होत होते. मात्र आज त्यामधे मोठी वाढ झालीय.
भिवंडी : शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर नाकाबंदी लावून पोलिसांकडून कडक चौकशी
भिवंडी : कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने राज्य सरकारने काल रात्रीपासून संचारबंदीची घोषणा केली. यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर नाकाबंदी लावून पोलिसांकडून कडक चौकशी केली जाते आहे. भिवंडी शहरातील बायपास साईबाबा जवळदेखील पोलिसांनी नाकेबंदी लावली आहे आणि अत्यावश्यक सेवा तसेच आरोग्य कर्मचारी यांना वगळता विनाकारण घराबाहेर निघालेल्या नागरिकांना पुन्हा घरी पाठवण्यात येत असून अनेकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे
बारामतीत संचारबंदीला चांगला प्रतिसाद, भिगवण चौकात तुरळक नागरिक
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात काल रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी करण्यात आली आहे. याला बारामतीकर चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. बारामतीतील भिगवण चौकात नेहमीपेक्षा तुरळक गर्दी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून बारामतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. काल दिवसभरात 303 रुग्ण बारामती तालुक्यात नव्याने कोरोनाबधित झाले आहेत. एकूणच राज्यभरातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. जर कोणी विनाकारण घराबाहेर पडलं तर पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करणार आहेत.
रत्नागिरी : शहरात विनाकारण फिरणाऱ्या आणि बाहेरून आलेल्या प्रत्येकाची तपासणी
रत्नागिरी : शहरात विनाकारण आणि बाहेरून आलेल्या प्रत्येकाची आता तपासणी केली जात आहे. त्याकरता आरोग्य विभागाने रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येते जिल्हा बाहेरून आलेली वाहने याची तपासणी करत त्यामधील ड्राइव्हर आणि क्लिनर यांची अँटीजेन चाचणी करायला सुरुवात केली आहे. तसेच रिक्षातुन येणाऱ्या प्रवाशांना देखील आता चौकशी करत पुढे सोडले जात आहे. नागरिक तकलादू कारण देत बाहेर पडत आहेत. त्यांना आळा बसेल शिवाय यामध्ये कोणी कोरोनाबाधित असेल तर कोरोनाबाधित रुग्ण देखील वेळीच शोधला जाईल याकरता सध्या कोरोना चाचणी केली जात आहे. शिवाय जिल्ह्याच्या इतर भागातून देखील एसटीने येणाऱ्या प्रवाशांची देखील पोलीस चौकशी करत आहे. यावेळी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन देखील जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने केले आहे.
रत्नागिरीत संचारबंदीला चांगला प्रतिसाद
राज्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु झाली आहे. योग्य कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची सध्या चौकशी सुरु असून सर्व खातरजमा झाल्यानंतरच संबंधित व्यक्तीला पुढे मार्गस्थ होण्यास परवानगी दिली जात आहे. रत्नागिरी शहर असो किंवा जिल्हा सध्या ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटिंग केली आहे. सध्या जिल्ह्यातील चित्र पाहता संचारबंदीच्या पहिल्या दिवशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.