(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर 1201 नव्या कोरोनाबाधितांची भर
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 953 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 99 हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही
राज्यात आज ओमायक्रॉनचा एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 65 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 35 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज आठ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7 हजार 350 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 273 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 80 , 06, 322 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 318 जणांचा मृत्यू, 6,317 नवे रूग्ण
आरोग्य मंत्रालनायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 318 लोकांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. तर 24 तासांत 6 हजार 317 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. 6 हजार 906 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशभरात 78 हाजर 190 कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. ही आकडेवारी गेल्या 575 दिवसांतील सर्वात कमी आहे. कोरोनाच्या रूग्णांमध्ये घट होत असतानाच दुसरीकडे चिंता वाढवणारी एक बातमी आहे. ओमायक्रॉनच्या (Omicron) रूग्णांच्या संखेत वाढ होत आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 213 रूग्ण आढळले आहेत. यात देशाची राजधानी दिल्लीत 57 तर महाराष्ट्रात 54 रूग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 90 ओमायक्रॉनचे रूग्ण बरे झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Omicron : बिल गेट्स म्हणतात ओमायक्रॉन लवकरच संपुष्टात येईल पण...
- अमेरिकेत ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू; राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले...
- Ankita Lokhande : 'मिसेस जैन' अंकिता लोखंडेचा ट्रेडिशनल लूक