Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 789 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर सात जणांचा मृत्यू
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 789 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 585 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 41 हजार 677 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. आज एकाही ओमायक्रॉन रुग्णाची राज्यात नोंद झाले आहे. राज्यात सध्या 10 ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू आहेत
राज्यात आज सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 482 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 74 हजार 353 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 887 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 65 , 17, 323 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 218 रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 218 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 103 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 1765 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,43,966 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1765 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.02 टक्के इतका झाला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 9419 रुग्णांची नोंद
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 9,419 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर या व्हायरसमुळे 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्के आहे. तर गेल्या 24 तासांत 8,251 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 3,40,97,388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्ह रेट 0.73 टक्के आहे. दरम्यान, पॉझिटिव्हिटी रेट सलग 66 दिवसांपासून 2 टक्क्यांनी खाली आला आहे. देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. तसेच प्रादुर्भावातही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :