(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात आज 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.43 टक्के
Coronavirus Cases Today : राज्यात आज 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 879 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 27 हजार 426 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.43 टक्के आहे.
राज्यात आज 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7537 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (16), नंदूरबार (0), धुळे (3), जालना (53), परभणी (33), हिंगोली (23), नांदेड (12), अकोला (22), अमरावती (11), वाशिम (02), अकोला (22), बुलढाणा (16), नागपूर (70), यवतमाळ (09), वर्धा (4), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (48) गडचिरोली (5 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 25 हजार 728 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,05, 205व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1004 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 13, 70, 390 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 463 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 463 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 558 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,28, 696 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4550 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1324 दिवसांवर गेला आहे.
Coronavirus : आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट अनिवार्य
देशात गेल्या 24 तासात 14 हजार 623 नव्या रुग्णांची नोंद
देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या (Covid19) संख्येत आज वाढ पाहायला मिळाली आहे. देशात गेल्या 24 तासात 14 हजार 623 नव्या रुग्ण आढळून आले आहेत. तर, 197 मृत्युंची नोंद झाली आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 9 हजार 651 वर पोहचली आहे. दरम्यान, देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 1 लाख 78 हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, गेल्या 24 तासात 19 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत एकूण 3 कोटी 34 लाख 78 हजार 247 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 996 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.