Maharashtra Coronavirus: आज राज्यात 61,695 नवीन कोरोना रुग्ण तर 53,335 रुग्ण बरे होऊन घरी
Maharashtra Corona Cases : आज राज्यात 61,695 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज 53,335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.3 टक्के एवढे आहे. राज्यात आज 349 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. आज राज्यात 61,695 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज 53,335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.3 टक्के एवढे आहे. राज्यात आज 349 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.63 टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,२०,०६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६,३९,८५५ (१५.८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,२७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. काल राज्यात 58 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती तर 39 हजार 624 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले होते. तर 278 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
Khumbh Mela 2021: कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक, पाच दिवसांत 1700 जणांना कोरोनाची लागण
बेड नाही हे उत्तर सहन करणार नाही- राजेश टोपे
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बेड न मिळणे, औषधं न मिळणे, ऑक्सिजन तुटवड्याच्या तक्रारी देखील येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यानंतर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, बेड मॅनेजमेंटसाठी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. बेडची संख्या वाढली पाहिजे. बेड नाही हे उत्तर सहन करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. आता 15 दिवस गॅप घेत आहोत. तर बेड वाढवले पाहिजेत. हॉस्पिटलमध्ये जागा नसेल तर चांगल्या इंस्टिट्यूटमध्ये बेड वाढवा. रुग्णालयांचे 80% बेड ताब्यात घेतले पाहिजेत. कोविड नियमावली बनवली पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असंही टोपे म्हणाले.