Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,586 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 67 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज 67 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,432 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज 3,586 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 410 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 24 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.08 टक्के आहे.
राज्यात आज 67 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,432 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (13), नंदूरबार (2), धुळे (3), जालना (22), अमरावती (97), अकोला (28), वाशिम (02), यवतमाळ (07), नागपूर (98), वर्धा (3), भंडारा (3), गोंदिया (7), चंद्रपूर (58), गडचिरोली (32 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
Corona Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवसात दोन कोटी नागरिकांना डोस
राज्यात सध्या 48 हजार 451 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,67,09,128 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,15,111 (11.49 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,81,072 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,813 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत आज 434 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र काही दिवसांपासून वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 434 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 387 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 40 हजार 443 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.