Maharashtra Corona Update : राज्यात आज 5031 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4380 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात सध्या 50 हजार 183 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,673 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबई : राज्यात आज 5031 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 380 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 47 हजार 414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के आहे.
राज्यात आज 216 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 35 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 50 हजार 183 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,673 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (41), नंदूरबार (1), जालना (85), परभणी (21), धुळे (17), , हिंगोली (61), नांदेड (34), अमरावती (93), अकोला (21), वाशिम (10), बुलढाणा (34), यवतमाळ (6), नागपूर (97), वर्धा (4), भंडारा (6), गोंदिया (4), गडचिरोली (25) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यातील पाच जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली नाही. धुळे, नंदुरबार, वाशिम, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 28,40,805 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,37,680 (12.18 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,98,2645 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,369 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 343 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 343 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 272 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,20,750 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2855 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2855 दिवसांवर गेला आहे.