एक्स्प्लोर

Maharashtra Congress President : महाराष्ट्र काँग्रेसचा नव्या नेतृत्वाचा शोध बिगर मराठा चेहऱ्यांवर केंद्रीत? काय आहेत कारणं

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा कल जाणून घेतला. बदल करायचाच असेल तर बिगर मराठा चेहरा द्या अशी सूचना या बैठकीत पुढे आली आहे.

मुंबई : बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलासाठी खलबतांना वेग आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा कल जाणून घेतला. बदल करायचाच असेल तर बिगर मराठा चेहरा द्या अशी सूचना या बैठकीत पुढे आली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसनं नव्या नेतृत्वशोधाच्या हालचाली सुरु केल्यात. आणि हा शोध बिगर मराठा नेतृत्वावर केंद्रीत होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात यांनी स्वत:च राजीनाम्याची तयारी दाखवल्यानंतर महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झालेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या राज्यातल्या तीन बड्या काँग्रेस नेत्यांशी त्यांनी खलबतं केली.

काँग्रेसचे मागचे दोनही प्रदेशाध्यक्ष मराठा समाजातलेच. नुकतेच मुंबई काँग्रेस अध्यक्ष नेमले गेलेले भाई जगताप हेही मराठाच आहे. नवा प्रदेशाध्यक्षही मराठाच नेमला तर सीएलपी, मुंबई अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशी तीनही पदांवर मराठा होईल. त्यामुळेच बदल करायचाच असेल तर जातीय संतुलनात मग बिगर मराठा चेहरा देण्याची गरज आहे अशी सूचना एका ज्येष्ठ नेत्यानं या बैठकीत केली.

EXCLUSIVE | एच के पाटील यांची थोरात आणि चव्हाणांशी चर्चा, काँग्रेसच्या बैठकीत काय काय झालं?

बाळासाहेब थोरात यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला खरंतर दीडच वर्ष झालं आहे. पण सध्या सीएलपी, महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद ही तीनही पदं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे काँग्रेसमधल्या एका गटान त्याबाबत ही मोहीम सुरु केली. पण जर बिगर मराठाच समीकरण ग्राह्य धरलं तर या शर्यतीतले अनेक चेहरे आपोआप बाद होतात.

दलित आणि आदिवासींबाबतच्या योजनांना निधी मिळत नाही म्हणून सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलं होतं. त्याची जोरदार चर्चाही झाली. काँग्रेस सर्व घटकांचा विचार करते हे दाखवण्याचा हायकमांडचा तो प्रयत्न होता. महाराष्ट्रात सध्या भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष मराठा आहेत. अशा स्थितीत जो विचार पत्राबाबत केला होता तो नेतृ्वनिवडीबाबतही करुन काँग्रेस सर्वसमावेशकता दाखवणारा का हा प्रश्न आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका, बहुतांश मंत्र्यांची महाराष्ट्र प्रभारींसमोर भूमिका

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण पेटलेलं आहे. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्षही आहेत. एकीकडे हे आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करतो आहे हे महाविकास आघाडी सरकारला दाखवणं आवश्यक आहे. सोबतच इतर जातींचा मतदार जो तुटत चालला आहे, तोही टिकवून ठेवणं काँग्रेसला गरजेचं आहे..फक्त तशी इमेज आणि समाजात स्थान असलेलं नेतृत्व काँग्रेसला मिळणार का हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget