Congress : काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांचे नेतृत्व 'या' नेत्याकडे! सोनिया गांधींची घेणार भेट
Congress MLA : महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी असून हे आमदार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आपली कैफियत मांडणार आहे.
Congress MLA : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये सध्या असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील नाराज आमदार पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हे नाराज आमदार एकवटले आहेत. पुढील महिन्यात हे नाराज आमदार पुढील आठवड्यात सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे.
काँग्रेसचे 25 ते 28 आमदार नाराज असल्याचे वृत्त समोर आलं होतं. महामंडळ अध्यक्ष आणि इतर महत्त्वाच्या पदांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, जिल्हा समित्या बनवल्या नाहीत, त्यामुळे अडीच वर्ष वाया गेल्याची भावना आमदारांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर या आमदारांनी सोनिया गांधींकडे तक्रार करायचं ठरवले आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नाराज आमदारांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहीले आहे. या पत्रावर 20 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप, जबाबदाऱ्यांचे वाटप झाले होते. त्यानुसार, काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आले होते. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मात्र, त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अद्यापपर्यंत विधानसभा अध्यक्षांची निवड झाली नाही. तर, दुसरीकडे महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्याने काँग्रेसचा सत्तेतील वाटा कमी राहिला आहे. आधीच कमी मंत्रिपदे आणि महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्याने सत्तेत कमी वाटा असल्याची खंत काँग्रेसमध्ये व्यक्त होत असल्याची चर्चा आहे.
पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकंदरीत महाविकास आघाडीत बरेच आमदार नाराज दिसत आहेत. शिवसेनेच आमदार, नेतेही नाराज असल्याचे दिसून आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Exclusive : ...तर मंत्री बदलावेत; काँग्रेसचे एकमेव खासदार धानोरकर काँग्रेसच्याच मंत्र्याविरोधात आक्रमक
- Sanjay Raut : यूपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही, यूपीएच्या मजबुतीसाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यावा : संजय राऊत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha