(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : यूपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही, यूपीएच्या मजबुतीसाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यावा : संजय राऊत
यूपीए (UPA) ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. सध्या यूपीए आहे की नाही अशी शंका येत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं
Sanjay Raut on UPA : यूपीएचे अध्यक्ष आणि काँग्रसचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय आहेत. युपीए (UPA) ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. सध्या यूपीए आहे की नाही अशी शंका येत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. आताच्या परिस्थितीत यूपीएचं नेतृत्व करायचे असेल तर त्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यायला हवा. पण काँग्रेस याबाबत पुढाकार घ्यायला तयार नसल्याचे राऊत म्हणाले. 2024 ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावीच लागेल. त्यासाठी यूपीएच्या सातबाऱ्यावर अनेक नावे टाकावीच लागतील, असेही राऊत यावेळी म्हणाले. काँग्रेसनं यूपीएच्या जिर्णोधाराची तयारी करायला हवी असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ते नेतृत्व करायला इच्छुक नाहीत, पण जे नेतृत्व करेल त्यांच्या पाठिशी ते खंबरीपणाने उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे या सर्व घडामोडींमध्ये आघाडीवर आहेत. सध्या यूपीए संदर्भात काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. काँग्रेसनं यूपीएच्या जिर्णोधाराची तयारी करायला हवी असे राऊत यावेळी म्हणाले.
पुढच्या निवडणुकीत जर भाजपला बहुमत मिळाले नाही तर पुन्हा एनडीए जन्माला येईल असेही राऊत म्हणाले. सध्या एनडीए पूर्णपणे संपला आहे. एनडीए अस्तित्वात नसल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजपला आज गरज नसल्याचे मुळं एनडीए भंगारात काढली आहे. एनडीएतून बाहेर पडलेल्यांनी एकत्र बसावे, चर्चा करावी असी विषय समोर येत आहे. अकाली दलाच्या नेत्यांसोबत याबबत चर्चा झाल्याचे राऊत यावेळी म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहे.
जेव्हा अनेक पक्षांचे सरकार असते तेव्हा नाराजी व्यक्त केली जाते. पण तिन्ही पक्षातील नेते यावर मार्ग काढतील असे राऊत यावेळी म्हणाले. भाजपला 22 कोटी मुस्लिमांचे महत्व कळले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या देशावर प्रेम करणारे कोणत्याही धर्माचे लोक असोत ते या देशाचे आणि या देशाचे ते असे राऊत म्हणाले. शिवसेनेला जे जनाब म्हणतायेत त्यांनी आता ही जनाबगिरी का सुरु केली आहे, असा टोला देखील राऊत यांनी भाजपला लगावला. महागाईच्या विरोधातील आंदोलनात भाजपच्या खासदारांनी सुद्धा सामील व्हायला हवे असेही राऊत यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: