विस्ताराला 40 दिवस, आता खातेवाटपही रखडलं! महत्वाची दोन कारणं, ज्यामुळं खातेवाटपाची प्रतीक्षा
शिंदे-फडणवीस सरकारचा 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र आता खातेवाटप रखडलं आहे. या खातेवाटप रखडण्याची दोन कारणं समोर आली आहे.
Maharashtra Cabinet News : शिंदे-फडणवीस सरकारचा 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) झाला मात्र आता खातेवाटप रखडलं आहे. या खातेवाटप रखडण्याची दोन कारणं समोर आली आहे. यातलं पहिलं कारण म्हणजे, शिंदे गट आणि भाजपमध्ये ऊर्जा आणि उद्योग या दोन खात्यांवरून तिढा निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच खातेवाटप रखडल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही गटांना ऊर्जा आणि उद्योग ही दोन खाती हवीत. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून आग्रह सुरु आहे. यावर तोडगा निघेल तेव्हाच खातेवाटप मार्गी लागेल असं सांगितलं जात आहे.
ऊर्जा आणि उद्योग खात्यांसाठी दोन्ही गटांत रस्सीखेच सुरु आहे. 40 दिवस विस्ताराचा तिढा आणि आता खातेवाटप किती दिवस रखडणार? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच ऊर्जा आणि उद्योग ही दोन महत्त्वाची खाती कुणाला मिळणार? याकडेही आता लक्ष लागून आहे.
नंतर येणाऱ्यांना कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय - मंत्री विजयकुमार गावित
विस्तार होऊन तीन दिवस होऊनही मंत्र्यांना खाती मिळालेलीच नाहीत. मात्र हा खातेवाटप पुढील दोन दिवसात होईल असा विश्वास नवनिर्वाचित मंत्री विजयकुमार गावित यांनी व्यक्त केलाय. जो काम करू शकेल अशांनाच मंत्रिपद दिल्याचं ते म्हणाले. 20 मंत्री आणि जास्त खाते असल्यानं वाटपाला वेळ लागतोय. कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणाऱ्यांना कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय, असं गावितांनी सांगितलं.
ही असतील संभाव्य खाती, सूत्रांची माहिती
1) एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास)
2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ
3) राधाकृष्ण विखे पाटील - महसूल, सहकार
4) सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन
5) चंद्रकांत पाटील - सार्वजनिक बांधकाम
6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास
7) गिरीश महाजन - जलसंपदा
8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा
9) दादा भुसे- कृषी
10) संजय राठोड- ग्राम विकास
11) सुरेश खाडे - सामाजिक न्याय
12) संदीपान भुमरे- रोजगार हमी
13) उदय सामंत - उद्योग
14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री
15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण
16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास
17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण
18) अतुल सावे - आरोग्य
19) शंभूराज देसाई उत्पादन शुल्क
20) मंगलप्रभात लोढा- विधी न्याय
इतर महत्वाच्या बातम्या