![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नितेश राणेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे एन्ट्री करणार!
विधानभवनातलं म्यॅाव म्यॅाव प्रकरण असेल किंवा दिशा सालियन प्रकरण राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. आता त्यांच्याच मतदारसंघात दाखल होत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल.
![नितेश राणेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे एन्ट्री करणार! Maharashtra cabinet minister Aaditya Thackeray to visit Nitesh Rane's Devgad constituency in his first day of Konkan tour नितेश राणेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे एन्ट्री करणार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/28/ad064bfe1172c35b72ddac449240aad5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राणे आणि शिवसेना यांच्यातलं नातं कसं आहे हे काही सांगण्यासाठी जाणकार किंवा ज्योतिषी असण्याची गरज नाही. राणे कुटुंबियांनी विविध मुद्द्यांवरुन सातत्याने राज्याचे पर्यावरण तसंच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता राणेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे एन्ट्री करणार आहेत, त्यामुळे तिथे ते काय बोलणार याची उत्सुकता असेल.
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे 28 ते 30 मार्चपासून कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे सकाळी चिपी विमानतळावर लॅन्ड होतील. यानंतर ते मालवण जेट्टीवर पाहणी करतील. मग कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन देवगड मतदारसंघात म्हणजे नितेश राणेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे सभा घेतील. देवगड नगरपंचायतीत शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
थेट राणेंच्या बालेकिल्ल्यात घुसून आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतील. विधानभवनातलं म्यॅाव म्यॅाव प्रकरण असेल किंवा दिशा सालियन प्रकरण, विविध प्रकरणात राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. आता त्यांच्याच मतदारसंघात दाखल होत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा
दिवस पहिला : 28 मार्च
सकाळी 10 वाजता : खासगी विमानाने सिंधुदुर्गकडे प्रयाण
सकाळी 10.30 वाजता : चिपी विमानतळावर आगमन, तिथून मालवणकडे प्रयाण
सकाळी 11 वाजता : जेट्टी बंधारा पाहणी, फिश अॅक्वेरियमचे सादरीकरण कार्यक्रमाला उपस्थिती
सकाळी 11.30 वाजता : कुणकेश्वरकडे प्रयाण
दुपारी 12.15 वाजता : श्री देव कुणकेश्वर दर्शन
दुपारी 12.25 वाजता : श्री देव कुणकेश्वर मंदिर इथल्या विविध विकासकामांच्या लोकार्पणास उपस्थिती
दुपारी 1 वाजता : नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 2.30 वाजता : राखीव
दुपारी 3 वाजता : वायंगणी, वेंगुर्लाकडे प्रयाण
दुपारी 4.30 वाजता : कासव जत्रा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती
संध्याकाळी 5 वाजता : सागरतीर्थ, वेंगुर्लाकडे प्रयाण
संध्याकाळी 5.30 वाजता : फोमेंटो ग्रुप व पाहणी
संध्याकाळी 6 वाजता : वेंगुर्लाकडे प्रयाण
संध्याकाळी 6.15 वाजता : विकासकामांचे भूमिपूजन, विविध प्रकल्पांची पाहणी
रात्री 7.15 वाजता : सिंधुरत्न समृद्ध योजना लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती
रात्री 8.15 वाजता : कुडाळकडे प्रयाण
रात्री 9.30 वाजता : शिमगोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती
रात्री 10.30 वाजता : मुक्काम
दिवस दुसरा : 29 मार्च
सकाळी 9 वाजता : लांजा, रत्नागिरीकडे प्रयाण
सकाळी 10.30 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती
सकाळी 11 वाजता : मेळाव्याला उपस्थिती
दुपारी 12 वाजता : पाली, रत्नागिरीकडे रवाना
दुपारी 12 वाजता : पाली, राखीव
दुपारी 1.30 वाजता : गणपतीपुळेकडे प्रयाण
दुपारी 2.15 वाजता : श्रींचे दर्शन
दुपारी 2.30 वाजता : भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 3.30 वाजता : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ बोट क्लबची पाहणी
दुपारी 3.45 वाजता : जयगड जेट्टीकडे प्रयाण
दुपारी 4.10 वाजता : जयगड जेट्टी इथे आगमन, फेरी बोटीने तवसाळकडे प्रयाण
दुपारी 4.40 वाजता : गुहाकरडे प्रयाण
संध्याकाळी 5.30 वाजता : वेळणेश्वर इथे भूमिपूजन आणि मेळाव्याला उपस्थिती
रात्री : गुहागरमध्ये मुक्काम
दिवस तिसरा : 30 मार्च
सकाळी 8.15 वाजता : सावर्डेकडे प्रयाण
सकाळी 9.05 वाजता : चित्रकला महाविद्यालयाला भेट आणि स्वर्गीय निकम यांच्या समाधीस्थळाला भेट
सकाळी 9.20 वाजता : पेठमाप, चिपळूणकडे प्रयाण
सकाळी 9.30 वाजता : उपक्रमाची पाहणी, लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती
सकाळी 10 वाजता : दापोलीकडे प्रयाण
सकाळी 11.30 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 12 वाजता : महाड, रायगडकडे प्रयाण
दुपारी 2 वाजता : महाडमध्ये आगमन
दुपारी 2.40 वाजता : लोणेरे, माणगावकडे प्रयाण
दुपारी 3 वाजता : भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 4.15 वाजता : मेळाव्याला उपस्थिती
संध्याकाळी 5.30 : मुंबईकडे प्रयाण
रात्री 8.30 वाजता : मुंबईत आगमन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)