Cabinet Expansion : मला मंत्रिपद देत नसाल, तर एखाद्या कार्यकर्त्याला द्या; मात्र बाहेरचा पालकमंत्री दिल्यास 100 टक्के विरोध : नरेंद्र भोंडेकर
मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला 100 टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.
Maharashtra Cabinet Expansion : मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप (BJP) किंवा शिवसेनेच्या (Shiv Sena) एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री (Guardian Minister) दिल्यास त्याला 100 टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील (Bhandara) शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) दिला आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) आता निर्णय घ्यायलाच पाहिजे, असंही नरेंद्र भोंडेकर म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
'बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री दिल्यास 100 टक्के विरोध'
राज्यातील शिंदे - फडणवीस यांचं सरकार येवून आता वर्षभराचा कालावधी झाला असला तरी, मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. याबाबत भंडाऱ्याचे शिंदे गटाचे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सरकारला इशाराच दिला आहे. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर, जिल्ह्याचा पालकमंत्री असायला हवा. मला जर मंत्रिपद देत नसाल तर, भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. अन्य जिल्ह्याला ज्या पद्धतीने स्थानिक पालकमंत्री देता, त्या पद्धतीने भंडारा जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री द्यावा, या मागणीला माझं समर्थन आहे. परंतु, बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री दिल्यास त्याला 100 टक्के विरोध होईल, असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
'आता मंत्रिमंडळ विस्तार व्हायलाच हवा'
आता मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायलाच पहिजे, ही माझीच नाही तर, सर्व आमदारांची भावना आहे. वर्षभरापासून केवळ 20 मंत्र्यांवरच राज्याचा कारभार चालला असून आता संपूर्ण मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे. आता निर्णय घ्यायलाच पाहिजे, मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या प्रमाणात करावा. मात्र, भंडारा जिल्ह्यावर अन्याय होता कामा नये, बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना भंडाऱ्याचा पालकमंत्री बनवल्याने जिल्ह्याचा विकास झालेला नाही. त्यामुळे स्थानिकांना मंत्रिपद देतानाच मंत्रिमंडळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करावा, अशा संतप्त भावना अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी 'माझा'शी बोलताना व्यक्त केल्या.
19 जून आधीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापनदिनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर मांडली. त्यामुळे 19 जून आधीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या सहा आणि शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री तर दोन हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदर राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा