(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीसांची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे का? भाजपच्या काळात राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्याही नेत्यांचे फोन टॅपिंग: दिलीप वळसे पाटील
Maharashtra Budget Session : महाराष्ट्राचं वातावरण हे सलोख्याचं होतं, आज ते बिघडवण्याचं काम केलं जात आहे. सूडबुद्धीने कारवाई केली जाते हे चुकीचं असं मत दिलीप वळसे पाटील यांनी मांडलं.
मुंबई: देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एक पेन ड्राईव्ह सादर केला, त्यांनी काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. भाजपच्या काळात रश्मी शुक्ला यांनी बच्चू कडू, संजय काकडे आणि त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोले यांचे फोट टॅप केले असाही आरोप त्यांनी केला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बच्चू कडू, नाना पटोले आणि संजय काकडे यांचे फोन टॅपिंग केले. संजय काकडे यांचं नाव परवेझ सुतार, बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन शेख बाबू तर त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोले यांचे नाव अमजद खान असं ठेवण्यात आलं होतं आणि त्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले.
रश्मी शुक्ला यांनी भाजपच्या काळात जाणीवपूर्वक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांवर पाळत ठेवलीच पण भाजपच्या नेत्यांवरही पाळत ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की,नवाब मलिक हे सातत्याने केंद्रावर आरोप करत होते, त्यांचे तोंड बंद करण्यासाठी जुनी प्रकरणं बाहेर काढली. फडणवीस साहेब तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री होता, त्यावेळी याचा सखोल अभ्यास झाला असता. वरून तुम्हीच म्हणता की तुम्ही पोलीस दलाचा वापर करता. अंबानींच्या घराखाली स्फोटकं का सापडली याचं अद्याप उत्तर नाही. एनआयएच्या तपासात अद्याप काही नाही.
दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की, अनिल देशमुख यांच्या बाबतीत ही असंच घडल आहे. कोणी तरी अॅंटेलिया या ठिकाणी जिलेटीन ठेवली.त्यात मनसुख हिरेन यांचा मर्डर झाली.एनआयने आतापर्यंत काय तपास झाला याची आम्हांला माहीती नाही. यात पोलीस अधिकारी यांनी पत्र लिहीले आणि म्हटलं की 100 कोटी रुपयांची मागणी केली. आता ती 250 कोटी रुपयांच्या पर्यंत गेली. अनिल देशमुख यांच्या वर 95 छापे टाकण्याचं काम केलं. एखाद्याला संपवण्याच काम केलं जातंय.
संबंधित बातम्या :
- Maharashtra Budget Session : विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा, या प्रकरणाचा सीआयडी तपास करणार: दिलीप वळसे पाटील
- फडणवीसांचा नवा पेनड्राईव्ह बॉम्ब; नवा ऑडिओ सादर, दाऊदशी नातं असलेल्या व्यक्तीला वक्फ बोर्डावर घेतलं!
- राज्यातील सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत गाजलं, अजित पवार-देवेंद्र फडणवीस आमनेसामने