एक्स्प्लोर

Maharashtra Budget Session 2023 : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे निरमा आंदोलन, नेत्यांच्या फोटोला घातली अंघोळ   

Maharashtra Budget Session : विरोधकांनीही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारच्या विरोधात निरमा आंदोलन केलं. नेत्यांच्या फोटोला निरम्याने आंघोळ घालत घोषणाबाजी देण्यात आली.

Maharashtra Budget Session 2023 : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे  (Maharashtra Budget Session 2023) शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. आजच्या दिवशी विविध मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी पक्षानं काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे विरोधक देखील शेतकरी प्रश्नासह विविध मुद्यावरुन आक्रमक झाले आहे. विरोधकांनीही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारच्या विरोधात निरमा आंदोलन केलं. नेत्यांच्या फोटोला निरम्याने आंघोळ घालत घोषणाबाजी देण्यात आली.

विरोधकांचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

राज्यातील अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांना अजूनही न मिळालेली मदत, पंचनामे, गुढीपाडवा उलटून गेला तरी आनंदाचा शिधा अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी न मिळाल्यामुळे विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरात निरमा पावडर, केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य सरकारच्या कारभाराविरोधात विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी देखील विरोधकांनी यावेळी केली. 

भाजपमध्ये गेल्यामुळं भ्रष्टाचारी लोक पतीत पावन झाले : अंबादास दानवे

सत्तेतील अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटले आहे. भ्रष्टाचारी लोकांना निरम्याने स्वच्छ करण्याचे काम आम्ही केले. हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही केले. ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले ते आज भाजपमध्ये गेले आहेत. भाजपमध्ये गेल्यामुळं ते पतीत पावन झाल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. 

भाजपच्या वतीनं देशभर राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन 

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं आणि यावरुनच आता देशभरात भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांचा निषेध आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. याच वक्तव्यावरुन संसदेत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली असून राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. यावर काँग्रेसच्या वतीने नुकताच राहुल गांधींचा एक फोटो ट्विट करत माफी मागायला सावरकर समजलात का? अशा पद्धतीचे ट्वीट करण्यात आले होते. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी, आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget